विक्रेत्याला चाईल्ड पॉर्न शेअर करण्याच्या धाडसामुळे एका भाजी विक्रेत्याच्या हातात बेड्या पडल्या आहेत. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली असून, हरिप्रसाद पटेल असं आरोपीचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे. तर अंधेरीत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो.
फेसबुकवरून मोठ्या प्रमाणात चाईल्ड पॉर्न शेअर केलं जात आहे. याविरोधात खुद्द फेसबुकनेच मोहीम उघडली असून, चाईल्ड पॉर्न शेअर करणाऱ्यांची माहिती फेसबुक पोलिसांना देत आहे. त्यावरून पोलिसांकडून तातडीनं कारवाई केली जात आहे. चाईल्ड पॉ न शेअर करण्यात आल्याचा एक प्रकार समोर आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अंधेरीत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या हरिप्रसाद पटेल यांने फेसबुकवरून अश्लील व्हिडीओ शेअर केला होता. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तपास करत अंधेरीत राहत असलेल्या हरिप्रसाद पटेलला अटक केली.
दुसऱ्यांदा चूक भोवली
मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या हरिप्रसाद यानं यापूर्वीही चाईल्ड पॉर्नचे व्हिडीओ फेसबुकवरून अपलोड केले होते. वर्षभरापूर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचं फेसबुक अकाऊंट बंद केलं होतं. मात्र, हरिप्रसादनं मित्राच्या मोबाईलवरून नवीन फेसबुक अकाऊंट सुरू केलं आणि चाईल्ड पॉर्नचा व्हिडीओ शेअर केला. दुसऱ्यांदा केलेली चूक हरिप्रसादच्या अंगलट आली.
चाईल्ड पॉर्नबद्दलची धक्कादायक आकडेवारी ।
काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेनं भारताला चाईल्ड पॉर्नसंबंधी धक्कादायक आकडेवारी दिली होती. भारतात गेल्या पाच महिन्यात चाईल्ड पॉर्नशी संबंधित २५ हजार मटेरिअल वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅ टफॉर्मवर अपलोड करण्यात आलं आहे. ही आकडेवारी अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ॲण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रनने (NCMEC) भारताच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडे सोपवली आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये गतवर्षी हा डेटा शेअर करण्यासंबंधी करार झाला होता. या अहवालातून मुंबई, ठाणे आणि पुण्यात चाईल्ड पॉ नची सर्वात जास्त प्रकरणं समोर आली आहे. फक्त मुंबईत ५०० प्रकरणं आहेत.