CM उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवाला उपस्थिती लावत सोमवारी देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री आज नाणार विषयी काही भाष्य करतील, अशी अपेक्षा होती पण मुख्यमंत्री काहीही न बोलता सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठकीसाठी निघून गेले.
आंगणेवाडीत; नाणारवर भराडी देवीची यात्रा मोठ्या दिमाखात सुरू झाली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या यात्रेला आले आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून दर्शनाच्या ९ रांगा तयार करण्यात आल्या असून पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे. अनेक मान्यवर व्यक्तींची यात्रेला उपस्थिती आहे. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचा सत्कार स्वीकारून मुख्यमंत्री जिल्हा आढावा बैठकीला निघाले. उद्योग मंत्री सुभाष देसाई, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, अतुल रावराणे त्यांच्या समवेत होते.