डोंबिवलीत १५ मार्चला आरोग्य शिबीर

डोंबिवली,  - मराठा उत्कर्ष मंडळ आणि आर. के. बाजार उद्योगसमूह यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर १५ मार्च रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सायंकाळी ४ नंतर एमआयडीसीतील माधवबाग क्लिनिकतर्फे मोफत हृदयरोग तपासणीदेखील केली जाणार आहे. डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, निवासी विभाग येथे हे शिबीर होईल.


हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना शिकलगार हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी नगरसेविका प्रमिला पाटील, योगिता पाटीलडॉ. ऐश्वर्या माने, सुजाता जाधव यांच्यासह कविता शेलार, सचिव कृष्णत भोसले, संध्या भोसलेकोषाध्यक्ष सुरेंद्र पाटील, रेखा जाधव आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सणस यांनी दिली. संपर्क : ९३२४९०४९९६.