देशभरात आतापर्यंत करोनाचा संसर्ग झालेले ३० रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेत दिल्ली राज्य सरकारने दिल्लीतील सर्वच प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी जाहीर केला. ते म्हणाले, याचाच अर्थ इयत्ता ५ वीपर्यंतचे विद्यार्थी ३१ मार्चपर्यंत शाळेत जाणार नाहीत. हा निर्णय उद्यापासून,६ मार्चपासून लागू होणार आहे. यात सरकारी, खासगी, अनुदानित आणि एनडीएमसी अशा सर्व शाळा बंद राहणार आहेत. दरम्यान, दिल्लीतील कार्यालयांमध्येही आता बायोमेट्रिक अटेंडन्स होणार नाहीत, असे कळवण्यात आले आहे.
दिल्लीतील प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद