मीरा भाईंदर मनपात चालते तरी काय असा प्रश्न पडायला लागला आहे वारंवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडले जाणारे मीरा भाईंदर महानगरपालिकेतले अधिकारी कर्मचारी हे शहरात वाढत चाललेल्या भ्रष्टाचाराची साक्ष देत आहेत. एक प्रकरण थंड होत नाही तोपर्यंत दुसरे प्रकरण घडून येते याचा अर्थ स्पष्ट होत आहे की मीरा भाईंदर मनपात फक्त चालते ते 'दाम करी काम' असी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मीरा भाईंदर शहराला अवैध फेरीवाले आणि अतिक्रमण करणाऱ्या मंडळींनी अक्षरशा विळखा घातला आहे रस्त्याच्या कडेला तर कुठे फूटपात ,तर कुठे रस्ता कब्जा केलेला दिसेल अवैध फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मनपा कडून कारवाई केली जाते त्या कारवाई दरम्यान अवैध फेरीवाल्यांचे समान हातगाडी या अन्य वस्तू जप्त करण्यात येतात . त्या परत घ्यावयाची झाल्यास मनपातल्या काही अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते अशा प्रकारचा कारभार सुरू होता. त्या लाचखोरीत अनेक बडे मासे ही सामील असतील असी शंका व्यक्त केली जात आहे.
भाईंदर पूर्व येथें बुर्जी पाव ची अवैधपणे चालणारी गाडी मिराभाईंदर मनपा च्या फेरीवाला पथकाने उचलून नेली होती आणि जप्त करून भाईंदर पश्चिम येथे असलेल्या उड्डाणपुलाखाली ठेवण्यात आली होती ती गाडी परत करण्यासाठी पालिका अधिकाऱ्याने गाडीदेण्याच्या बदल्यात २००० रुपयांची लाच मागितली होती. भाईंदर पूर्व येथे कार्यरत असलेल्या उज्ज्वल संख्ये यांच्या कडून करण्यात आली होती तेंव्हा त्या गाडी मालकाने या संदर्भातील तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली या तक्रारीची पोलिसांनी खात्री केल्या नंतर या लाच खोरांच्या मुसक्या अवळण्यासाठी सापळा रचला गेला २५ फेब्रुवारी रोजी सापळा लावून उज्ज्वल संख्ये यांच्या सांगण्यावरून सैनिक सिक्युरिटी चा सुरक्षा रक्षक असलेला रंजन मोतीराम राऊत वय वर्षे ४२ याला दीड हजार रुपये घेतांना रंगेहात पकडण्यात आले. ACB ची कारवाई झाल्याची कळताच उज्ज्वल संख्ये हा फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.