ठाणे-घोडबंदर एलिव्हेटेड रोड, बोरिवली ते ठाणे अवघ्या दहा मिनिटांत


मुंबई- मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्याबरोबर वेगवान वाहतूक व प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आले असून ठाणे ते बोरिवली असा भुयारी मार्गाचा । महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहेत्याशिवाय ठाणे ते घोडबंदर असा ७०० कोटी रुपये खर्च करून एलिव्हेटेड मार्गाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आखल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली. राज्यातील रस्ते जोडणी, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई -पुणे द्रुतगती  महामार्ग, ठाणे खाडीवरील तिसरा पूल, कल्याण- शीळफाटा रस्ता, शीव-पनवेल महामार्गावरील भविष्यातील योजनाची व सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचा अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या ठाण्याहून बोरिवलीला घोडबंदरमार्गे जाण्यासाठी एक- दोन तास लागतात, पण या ठिकाणी भयारी मार्ग केला तर दहा मिनिटांत ठाणे-बोरिवली अंतर पार करता येईल. या प्रकल्पात दहा किमीचा बोगदा आहे आणि त्यामध्ये एक किमीचा जोडरस्ताही आहे. ठाण्यातील टिकजिनीवाडीहून । बोरिवलीला येईल. त्यामुळे मुंबईठाणे हे अंतर जवळ येईल तसेच इंधन, वेळेची बचत व प्रदूषणाला आळा बसेल. या प्रकल्पासाठी वन खात्याकडे परवानगीचा प्रस्ताव सादर केला आहे.