येस बँकेचे खातेदार हवालदिल .१०९ बँकांचे व्यवहार अडचणीत


मुंबई : कंपनी सुशासन आणि कर्ज वितरणातील अनियमिततेमुळे येस बँकेवर आर्थिक निर्बध लागू केल्याचे पडसाद शुक्रवारी बँकेच्या खातेदारांसह देशाच्या अर्थक्षेत्रावर उमटले. गुरुवारी रात्रीपासून येस बँकेच्या विविध शाखा तसेच एटीएममध्ये खातेदार, ठेवीदारांची गर्दी उसळली, तर भांडवली बाजारात भूकंपस्थिती निर्माण झाली. या बँकेत ठेवी असणाऱ्या राज्यातील १०९ बँका अडचणीत आल्या असून काही पालिका आणि विद्यापीठांचा निधीही अडकला आहे.


: येस या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने खासगी बँकेचा पुनर्बाधणी योजना आराखडा शुक्रवारी सादर केला. याअंतर्गत महिन्याभराचा निर्बध कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच इच्छुक गंतवणकदाराला येस बँकेत ४९ टक्के हिस्सा घेता येईल. तसेच बँकेवर मुख्याधिकाऱ्यासह नवे व्यवस्थापकीय संचालक मंडळ नियुक्त करता येईल. बँकेवर निर्बध असलेल्या कालावधीत या प्रमाणात बँकेत हिस्सा घेतल्यानंतर इच्छक (स्टेट बँक) गुंतवणूकदाराला ते प्रमाण तीन वर्षात २६ टक्क्यांवर आणावे लागेल, अशी अट टाकण्यात आली आहे. ५,००० कोटी रुपयांपर्यंतचे भांडवल आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह बँकेचे चारच सदस्य असलेले संचालक मंडळ बँकेला नियुक्त करावे लागेल. 


कर्जवाटपाबाबतच शंका - स्टेट बँक


स्टेट बँक अमक क्षेत्राला कर्ज दिले म्हणन नव्हे तर एकणच कर्ज वितरणाच्या धोरणाबाबत शंका घेण्यासारखी स्थिती असल्याचे खासगी बँकेत हिस्सा खरेदी करू शिक्षण पाहणाऱ्या स्टेट बँकेने स्पष्ट केले आहे. बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिल्लीत अर्थमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर येस बँकेची स्थिती निर्बध कालावधीपर्यंत पूर्वपदावर येईल, असा दावा केला. आर्थिक स्थैर्यासह ठोस आराखडयासह ही बँक पुन्हा सक्षम होईल, असेही ते म्हणाले.


महापालिका, विद्यापीठांच्याही ठेवी.. 


येस बँकेत पिंपरी महापालिकेच्या तब्बल ८०० कोटी मण्यांच्या रेती आदेत केला घरघर लागल्याने महापालिका धास्तावली असन कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रमावस्था आहे. नाशिक महापालिका. शिक्षण मंडळ, स्मार्ट सिटी सारख्या कंपन्यांच्या समारे १०० कोटींच्या ठेवी येस बँकेत आहेत. तसेच राष्ट्रसंत तकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 'येस' बँकेमध्ये १९१ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत.


विपरीत परिणाम..


बँकेच्या खातेदारांना ५० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढण्याचे निर्बध घालण्यात आल्यानंतर शुक्रवारी सकाळी बँक शाखा सुरू होताच ठेवीदार, ग्राहकांची गर्दी उसळली. राज्यात बँकेच्या शाखा तसेच एटीएमजवळ तपास यंत्रणांना सुरक्षितता वाढवावी लागली. येस बँकेबरोबर होणाऱ्या अप्रत्यक्ष व्यवहारांवर विपरीत परिणाम झाला असून अनेक तंत्रस्नेही वेतन देय तसेच दलाली पेढी मंचावर अस्वस्थता निमाण झाला. यस बकचा भागीदार फोनपेची सेवा तात्पुरती खंडित झाली.


विदर्भातील बँकांचा समावेश


'येस' बँकेवरील र्निबधामुळे नागपुरातील आनंद नागरी सहकारी बँकेसह विदर्भातील अकोला मर्चन्ट को. ऑपरेटिव्ह बँक, अकोला अर्बन अकोला, वाना सहकारी बँक हिंगणघाट, महिला अर्बन गोंदिया, वर्धा नागरी सहकारी बँक वर्धा, आशीर्वाद महिला नागरी सहकारी बँक वर्धा, यवतमाळ जिल्हा सहकारी बँक, यवतमाळ अर्बन सहकारी बँक, अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चिखली अर्बन सहकारी बँक, विदर्भ र्मचट सहकारी बँकांसह संपूर्ण राज्यातील १०९ बँकांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे. 


रिझव्ह बँकेने 'येस' बँकेवर निर्बध घातल्याने या बँकेत ठेवी ठेवणाऱ्या राज्यातील १०९ बँका अडचणीत आल्या असून त्यात विदर्भातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह काही नागरी बँका व काही पत संस्थांचाही समावेश आहे. या बँकांचे सर्व 'ऑनलाईन' व्यवहार ठप्प झाले होते. व्यापाऱ्यांनी येस बँकेशी संबंधित धनादेशही स्वीकारण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली.