वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हा रजि नं. १८७/२०२० भा.द.वि.स. कलम ४२०, ३४ या गन्ह्याची उकल केली असून गुन्ह्यातील फिर्यादी पुरष वय २४ वर्षे रा. चिंचोटी गाव, वसई पूर्व, जि. पालघर हे दिनांक २४/०२/२०२० रोजी ४.१५ वाजता वसई फाटा येथे एक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता अज्ञात इसमांनी दिशाभूल करुन फसवणूक करुन त्यांचे एटीएम बदली करुन एटीएममधून पैसे काढले त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्या अनुशंगाने गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तपास करुन अरोपीत नामे.. राजवीर हसमुख भट (२८), जितेंद्र आखिलांनद तिवारी (३७) यांना अटक करुन त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे ५३ एटीएम कार्ड, रोख रक्कम असा एकूण ४,२४,२२० रुपर्य किंमतीचा माल जप्त केला. सदर आरोपींचे अभिलेख पडताळून पाहता एटिएम कार्ड बदली करुन लोकांची फसवणूक केल्याचे गुजरात राज्यात एकूण १० गुन्हे व राज्यात ५ गुन्हे दाखल आहेत.
राज्यात ५ गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक विलास चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली वाली पोलीस ठाणेचे सपोनीज्ञानेश फडतरे, पोहवा- मनोज मोरे, मकेश पवार, मोना- सागर यादव, सचिन दोरकर, अनिल सोनवणे, राजेंद्र फड, सोतष गांगुर्डे, पोशि- विनेश कोकणी, सचिन दळवी, बालाजी गायकवाड, स्वप्नील तोत्रे, गजानन गरिबे यांनी केला आहे.