आरक्षित जागेवर भमाफियाचा कब्जा

विरार : कचराभूमीसाठी आरक्षित जमीन भूमाफियांनी काबीज केल्याचा प्रकार वसईत समोर आला आहे. या जमिनीवर आता बेकायदेशीररीत्या चाळी उभारल्या जात आहेत. त्यामुळे आधीच ।। शहरात कचराभूमीच्या जागेची टंचाई भासत असताना आरक्षित जागेवर असे प्रकार सुरु असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.


वसई पूर्वेच्या राजिवली भागात सर्वे क्रमांक ११५ ची जमीन कचरा भूमीसाठी आरक्षित आहे. पालिकेने अद्याप ही जागा कचराभूमीसाठी तयार केलेली नाही. मात्र हा भूखंड आता भूमाफियांनी आपल्या कब्जात घेतलेला दिसतो. या जमिनीवर बिल्डरांनी माती टाकून चाळ बांधण्याचे काम हाती घेतले आहे. महापालिकेकडे वसईच्या गोखीवरे येथे एकच कचराभूमी आहे. ती जागाही अपुरी पडत असल्याने पालिकेला टंचाई भेडसावत आहे.