मेट्रो ३ चे सत्य - भूयारी रेल्वे, 'मौत का कुवा'

मुंबईकरांनी वेळीच जागे  व्हावे 


मुंबईत भूयारी रेल्वेसाठी आरेच्या जंगलातील कारशेडवरून वाद पेटला आहे. पण या प्रकल्पामुळे राहत्या इमारतीदेखील उखडल्या जात आहेत याकडे टकरांनी 'लक्ष्मी' व 'मेहेर मंझिल' दोन इमारतींतील नागरिक दि. ९ नोव्हेंबर पासुन त्यांच्या इमारती खचल्याने घराबाहेर आहेत. हजारो इमारतींचा पाया या प्रकल्पाने खिळखिळा केला आहे. यात हुतात्मा चौकातील सिध्दार्थ कॉलेज, पेटीट वाचनालय चर्चगेटची रेल्वेची इमारत इ. सुप्रसिद्ध ऐतिहासिक वारसा म्हणून नमूद केलेल्या अनेक इमारती आहेत.


अशा हजारो इमारतींना त्याच जागी पुन्हा बांधणे भूयारी रेल्वेबाबतच्या निबंधांमुळे शक्य नाही. पण हे लपवले जात आहे. कधीही छोटा- मोठा भूकंप झाल्यास किंवा न झाला तरी या इमारती कोसळतील. यामुळे एकतर यातील नागरिक किंवा भूयारातील शेकडो, हजारो प्रवासी मृत्यू पावले तरी मेट्रोला त्याची पर्वा नाही, हे त्यांच्या वर्तनातुन स्पष्ट झाले आहे.


आरे जंगलातील झाडे मेट्रो ३ भूयारी रेल्वे प्रकल्पासाठी तोडली. या प्रकल्पाने आतापर्यंत माहीमच्या खाडीतील जंगलासह सुमारे २०००० झाडे तोडली. आरेतील झाडे तोडण्यास मोठा विरोध झाला. शिवसेनेसह काही पक्षही त्या विरोधात सहभागी झाले. मेट्रो यार्ड आरेत नको असे म्हणाले.


___ मेट्रो रेल्वे करणाऱ्या 'एम एम आर सी एल' कडून असा प्रचार होत आहे की, 'तुम्हाला आरेतील जंगल हवे असेल तर भूयारी रेल्वे गमावाल'. मुंबईच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यात अडथळा ठराल.


 मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न सुटावा असे सर्वांना वाटत असल्याने या बॅकमेलिंगला झाडे तोडण्यास विरोध करणारे पक्ष व वृक्षप्रेमीही बळी पडत आहेत असे दिसते. 


या प्रकल्पाबाबत एम एम आर सी एल ने आतापर्यंत खूप खोटा प्रचार केला. आता असा प्रचार चालू आहे की, मोठ्या प्रमाणात जाहीरातदार पुढे येत आहेत. मोठ्या विकासकांना आपल्या संकुलांमधून मेट्रो स्टेशनात थेट प्रवेशाची सोय हवी आहे. या सर्व वावड्या आहेत. 


वास्तव काही वेगळे आहे. ते आपण पाहू.


१) माहीममधे मेट्रो ३ च्या कामामुळे 'लक्ष्मी बिल्डिंग' व 'मेहेर मंझिल' या दोन इमारतींचा पाया खचला आहे. दि. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी मध्यरात्री भयंकर हादरे बसल्यामुळे या इमारतीतील रहिवासी आहे त्या स्थितीत बाहेर पळाले, ते तेव्हापासुन बाहेरच आहेत. त्यांना मेट्रो कडून रोजचे खाण्याचे व राहण्याचे पैसे दिले जात आहेत. स्ट्रक्चरल इंजिनिअरांचे लेखी मत आहे की, या इमारतीत राहू नये. त्या कधीही पडू शकतात. त्या पाडाव्या. या इमारती त्या मध्यरात्री पडल्या असत्या तर त्या दुर्घटनेत शेकडो माणसे मृत्युमुखी पडली असती. माहीममधे मेट्रो ने ६६ इमारतींची यादी बनवली होती, ज्यांना धोका पोहचू शकतो. असा प्रकार मुंबईतील हजारो इमारतींबाबत या प्रकल्पामुळे झाला आहे. प्रकल्पातील २७ स्थानके व इतर कामांत केलेल्या खोदकामाने पायाला लागुन खोल बांधकाम करून या इमारतींना हादरे दिले आहेत व पाया खिळखिळा केला आहे. यांच्यावर माहीमच्या इमारतींप्रमाणे येत्या काही वर्षांत कधीही संकट ओढवेल.


२) हा प्रकल्प मुंबईच्या उज्वल भविष्यासाठी आहे, असा खोटा प्रचार होत आहे. वास्तवात मेट्रो ३ ने मुंबईसाठी आधीच अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास, ऐतिहासिक भीषण दुर्घटना घडवणार आहे. त्यानंतर तो वापरात येणार नाही. कायमचा कुलुप लावून बंद ठेवला जाईल व मुंबईसाठी एक  ङ'लांच्छन' म्हणून ओळखला जाईल. पुढील माहिती प्रकल्पाच्या अधिकृत अहवालावर आधारित आहे. त्यातुन भविष्यात काय वाढून  ठेवले आहे ते लक्षात येईल. अ) या प्रकल्पात मुंबईचे अधिकात अधिक तापमान धरावयास हवे. पण 'सरासरी उच्चतम' अशी टूम काढली  आहे. ते ३२.२ष्टसे धरले आहे. - प्रत्यक्षात उन्हाळ्यात बहुतेक दिवशी तापमान ४० ते ४५० से पर्यंत वर जाते. या वेळी भूयारातील तापमान यापेक्षा जास्त असणार आहे. जागतिक तापमानवाढीमुळे दरवर्षी तापमान वाढत चालले आहे. या प्रकल्पाबाबत अनेक दुर्घटनांची शक्यता आहे. पण आपण साधी वाटणारी वीज जाण्याची शक्यता पाहू. ४० ष्टसे च्या वर तापमान असताना वीज गेली व पर्यायी व्यवस्था बंद पडली, जो आपला नेहमीचा अनुभव असतो, तर अशावेळी भूयारात मिट्ट काळोख असेल, तुम्ही सुमारे ७५ ते १२० फूट खोलीवर उकडुन, भाजून निघत असाल. कोणतीही मदत पोहचू शकणार नाही. या प्रकल्पात यामुळे एकाच वेळी शेकडो किंवा हजारो माणसे मृत्युमुखी पडणार आहेत. जे प्रकल्पकर्ते खोटे तापमान दाखवतात, ते तसे करतात, कारण खऱ्या तापमानाचा विचार केल्यास प्रकल्प करताच आला नसता. 


हा प्रकल्प करताना नेहमी युरोप अमेरिकेचे उल्लेख होतात. तेथील तापमान शून्याजवळ असण्याच्या काळात, त्यांनी असे प्रकल्प केले. आता जगाचे तापमान दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे मानवजात व जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू झाले आहे. ऑस्ट्रेलियातील वणव्यांमधे ते स्पष्ट झाले आहे. अशावेळी तापमानवाढीचा वेग वाढवणारा असा प्रकल्प करताच कामा नये. परंतु प्रकल्प करणारांना मुंबईचेच तापमान लपवायचे आहे तिथे ते पृथ्वीच्या तापमानाची का चिंता करतील? मरोनात का मुंबईचे लोक. कंपन्या प्रकल्पातून प्रचंड पैसा कमावून निघून जातील. हेच वरळी वांद्रे सी लिंकबाबत घडले. 'यु पी स्टेट ब्रिज कॉर्पोरेशन' सागरात गरज नसताना भराव करून निघुन गेले. त्याचा परिणाम म्हणून मुंबईची ४ हजार माणसे २६ जुलै च्या महापूरात बुडून मेली. तेव्हा सी लिंकचा महापूरातील वाटा लोकांना समजला नाही. त्यामुळे हा गुन्हा पचून गेला. परंतु या प्रकरणी तसे निसटून जाता येणार नाही.


ब) माहीमच्या इमारतींचा पाया खचण्यास पाण्याचा शिरकाव कारण आहे. हा सागराचा शिरकाव आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. माहीम (प्रभादेवी, दादर, माहीम) हे वाळूचे बेट आहे. मेट्रो प्रकल्प करताना मातीची आवश्यक ती परिक्षणे केलेली नाहीत. रेल्वे ही सार्वजनिक सेवा असल्याचे कारण पुढे करून, सार्वजनिक सुनावणी टाळण्यात आली. नाहीतर या बाबी पुढे आल्या असत्या. हे भीषण स्वरूपाच्या दुर्घटनेला आमंत्रण देणे आहे.


याचा संबंध भूकंपप्रवणतेशी देखील आहे. मुंबईची मूळ बेटे म्हणजे 'कुलाबा ते माहीम - सायन' हा भाग ४ क्रमांकाच्या अतिधोकादायक प्रवर्गात येतो. मुंबईच्या मूळ बेटांपासुन ते रत्नागिरी असा हा किनारपट्टीचा भाग, झोन ४ मधे आहे. तरीही त्याला 'मध्यम धोकादायक झोन ३' दाखवून प्रकल्प रेटला जात आहे. हे जनतेच्या जीवाशी खेळणे आहे. भूकंपाच्या धक्क्याने भूयारी रेल्वे खचू शकते. जमिनीअंतर्गत वेगवेगळे थर आहेत. खडकांच्या थरांत लाव्हा रसाच्या राखेचे थर आहेत. त्यांना पाणी लागल्यास ते दबून जातात. सागर आत शिरू शकतो. आग लागू शकते. खिळखिळया झालेल्या इमारती खचू शकतात. दुर्घटना कधीही घडू  शकतात यामुळे हा  प्रकल्प मौत का कुवा ठरणार आहे 


३) कफ परेड ते सीप्झ हे अंतर फक्त ६० मिनिटात कापणार असा दावा मेट्रो ३ ने झाडे तोडल्यावर संतापलेल्या मुंबईकरांना भुलवण्यासाठी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीत लेखी स्वरूपात केला आहे. हे असत्य आहे.


पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते बोरिवली हे साधारण समान अंतर (३३.५ - ३४ किमी.) आहे. यात २१ स्थानके आहेत. ही रूंद गेजची (ब्रॉडगेज) रेल्वे आहे. जास्त स्थैर्य आहे. त्यामुळे वेग आहे. जवळजवळ सरळ रेषेत हा मार्ग आहे. दरवाजे उघडे आहेत. धीम्या लोकलला या अंतरासाठी सुमारे ६५ मिनिटे लागतात. एका स्थानकासाठी ३ मिनिटे असा हा वेळ आहे.


याची मेट्रो ३ शी तुलना करू. मेट्रो ३ ब्रॉ डगेज नाही. या मार्गावर २७ स्थानके आहेत. मार्ग वळणावळणाचा आहे. पाच ठिकाणी तर अत्यंत बाकदार (९०ष्ट) वळणे आहेत. स्थानके जवळ जवळ म्हणजे एकमेकांपासुन कमी अंतरावर आहेत. त्यामुळे गाडीला वेग घेताच येणार नाही. तुलनेने स्थैर्य कमी आहे. दरवाजे स्वयंचलित असणार आहेत. त्यांना उघडण्या- बंद होण्यास वेळ लागतो.


अशा स्थितीत पश्चिम रेल्वेवर जर एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो तर मेट्रो- ३, एका तासात प्रवाशांना नेईल हे शक्यच नाही. मेट्रो- ३ चा शेड्यूल्ड वेग हा प. रेल्वेच्या निम्म्याहून कमी असणार आहे. या सगळ्याचा अर्थ मेट्रो ३ भूयारी रेल्वेला कफ परेड ते सीप्झ हे अंतर कापण्यास एका स्टेशनास प. रेल्वेच्या किमान दुप्पट म्हणजे ६ मिनिटे वेळ लागेल. म्हणजे मेट्रो ३ भूयारी रेल्वेला २७४६१६२ मिनिटे, म्हणजे दोन तास बेचाळीस मिनिटे वेळ लागेल. स्पष्ट आहे की, मुंबईतील नागरिक एवढा वेळ एवढ्या छोट्या अंतरासाठी देऊ शकत नाही. आणि ही काही माथेरानची मिनी ट्रेन नाही की बसल्या बसल्या सृष्टीसौंदर्य दिसणार!


थोडक्यात मुंबईकर या रेल्वेचा वापर करणार नाहीत.


४) मेट्रो ३ भूयारी रेल्वे प्रकल्प प्रदूषण कमी करणार नाही. : हा प्रकल्प चालवण्यासाठी कोळसा जाळून केलेली वीज (औष्णिक) वापरणार आहेत. रोज १९ तास रेल्वे चालली आणि १५० मेगावॅट वीज वापरली व वाहून आणण्यातील गळती ३० धरली तर या प्रकल्पामुळे औष्णिक विद्युत प्रकल्प प्रत्येक दिवशी ४०९५ मेट्रिक टन आणि एका वर्षात १४,९४,६७५ मे. टन फक्त कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन करेल. इतर, हवा व पाण्यातील प्रदूषण, राख इ. आणि प्रचंड पाणीवापर वेगळा.


हे वायूप्रदूषण मुंबईतील 'बेस्ट बस' व 'टॅ क्सी - रिक्षा' या सार्वजनिक वाहनांच्या एकत्रित प्रदूषणापेक्षा खूप जास्त आहे. 


भूयारामुळे वायुवीजन व प्रकाश यांची व्यवस्था करण्यास अधिक वीज निर्माण करणे आवश्यक होते. पृथ्वीची तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे. जीवसृष्टी नष्ट होणे सुरू झाले आहे. अशावेळी तापमानात भर घालणारा ऊर्जावापर कमी करण्याची गरज आहे. त्याऐवजी ऊर्जेची अशी उधळपट्टी करणारा अनावश्यक व धोकादायक प्रकल्प हाती घेणे हा बेजबाबदारपणा आहे. जर्मनीसारख्या मोटारी व मेट्रोच्या संशोधक देशाने आता त्यापासून परावृत्त करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी उत्कृष्ट सार्वजनिक बस सेवा विनाशुल्क केली. कोळसा जाळून वीज बनवणारी केंद्रे बंद करणे सुरू केले. येथे मात्र, नगण्य जागा व्यापून सवाधिक सेवा देणारी बस चालू राहिली तर मेट्रोने व मोटारीने कुणी जाणार नाही म्हणून सव्वाशे वर्षांची उत्कृष्ट बेस्ट बस सेवा बंद पाडत आहेत व अधिकाधिक कोळसा जाळत आहेत.


खुद्द शहरातील कोंडी व प्रदूषण वाढणार आहे कारण प्रत्येक स्थानकात ५ ते ६ येण्या- जाण्याचे मार्ग हे रस्ते व फूटपाथची जागा व्यापणार आहेत. शिवाय भूयारांत निर्माण होणारे दूषित विषारी वायू ठिकठिकाणी उंच धुराडी बांधून सोडण्यात येणार आहेत.