गर्दीचे कार्यक्रम पुढे ढकलण्याचे केंद्र सरकारचे निर्देश :
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी .. गर्दीचे कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश आज केंद्र सरकारने दिले. त्याचप्रमाणे मास्कची होणारी साठेबाजी रोखण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कुणालाही मास्क विकण्यास मनाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात १८ जानेवारीपासून ताप, सर्दीखोकला अशी लक्षणे आढळलेल्या कोरोनाच्या २२९ संशयित रुग्णांपैकी २०४ रुग्ण निगेटिव्ह आढळले आहेत. सध्या मुंबईत १६, नाशिकमध्ये ३, पुण्यात ४ तर नांदेड आणि सांगलीत प्रत्येकी एक संशयित रुग्ण स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आला आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ६८४ विमानांमधील ८३५१६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती आरोग्य विभागाच्या राज्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली....
कोरोनाच्या भीतीने अन मेडिकलमधून पीपाइ। मेडिकलमधून पीपीई किटस् आणि 'एन-९५' मास्कची मागणी करत आहेत. मेडिकल दुकानदारही त्याचा गैरफायदा घेऊन साठेबाजी करू लागले आहेत तसेच मास्कसाठी जादा दर आकारणी करत आहेत, अशा तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे आल्या होत्या. त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विक्री करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. औषध निरीक्षकांना मेडिकल दुकानांमधील साठ्याची. तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आल आहेत.