मुंबई - संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा शिरकाव झाला असून या विषाणूचा होत असलेल्या फैलावामुळे जगभरात ठप्प होत असलेल्या अर्थव्यवस्था, खनिज तेलाच्या दरात घट आणि जगभरातील शेअर बाजारांमधील घसरण यामुळे मुंबई शेअर बाजार सोमवारी गडगडला. या व्हायरसचा प्रादभाव हाऊ नये यासाठी कद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र अशातच कोरोना व्हायरसचे देशात ४५ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. या रुग्णांवर नायडू हॉस्पिटल येथे विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही असं आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आलं आहे.
होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा, ऊरुस पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असं प्रशासनाने सांगितले आहे. होळी सण कुटुंबासोबतच साजरा करा असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी केले आहे
भारतातकोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणखी दोन राज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटक आणि पंजाबमध्ये कोरोना व्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतात आता कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. कर्नाटकमधील बंगळुरू येथील एका आयटी इंजिनीअरला कोरोना व्हायरसची लागण झाला आहे. हा कर्नाटकातील पहिला रुग्ण आहे. तर पंजाबमध्येही कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण इटलीहून भारतात परतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
करोनाचे आव्हान पेलण्यास मुंबई महापालिका सज्ज
करोना संसर्गाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. चार उपनगरीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष आणि अतिरिक्त खाटांची उपलब्धता ठेवण्यासह आता खासगी रुग्णालयांची मदतही घेण्यात येणार आहे. खासगी, सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांच्या सहकार्याने एकूण ४०० खाटांची गरज पडल्यास उपलब्धता ठेवण्यात येणार आहे.