मुंबई - नोकरीसाठी | मुलाखत घेण्यासाठी कंपनीतील * किंवा बॉस असतो मात्र आता हे चित्र बदलताना पाहायला मिळणार आहे. तुमची मुलाखत आता एक रोबोट घेणार आहे. हा प्रयोग पहिल्यांदा फेडरल बँकेनं केला. प्रायोगिक तत्वावर रोबोट फेडरल बँकेत होणाऱ्या मुलाखती घेणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीनं एक टूल तयार करण्यात आलं आहे. FedRecruit या टूलद्वारे ही मुलाखत घेतली जाणार आहे.
भारतात पहिल्यांदाच AR ऐवजी रोबोट मुलाखत घेणार आहे. जेव्हा तुमची नियुक्ती होईल तेव्हा तुम्ही शेवटच्या राऊंडला HRuee भेटू शकणार आहेत. मात्र बाकी मुलाखतीचे टप्पे हा रोबोटच" घेणार आहे.
FedRecruit वेगवेगळ्या आधारांवर मुलाखतीला येणाऱ्या तरुणाची पारख करु शकणार आहे, कॅन्डिडेटची आकालन क्षमता, बुद्धीमत्ता, चिकाटी, निरीक्षण क्षमता हजरजबाबीपणा या सगळ्या गोष्टी एकाचवेळी रोबोट यशस्वीरित्या तपासू शकणार आहे. मुलाखतीला येणाऱ्या उमेदवाराला अंक दिले जातील. या अंकांच्या आधारावर रोबोटिक इंटरव्यू, साइकोमेट्रिक आणि खेळ आधारीत असतील. अंकांच्या आधारावर रोबोट तुमचं परीक्षण करणार आहे.
फेडरल बँकेच्या R chifves इकोनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार रोबोटिक इंटरव्यूमुळे उमेदवाराचे व्यक्तिमत्व जाणून घेणं अधिक सोप होईल. वर्चुअल फेस टू फेस इंटरव्यूसाठी व्हिडिओचा वापर केला जाणार आहे.
___ निवडलेल्या उमेदवाराला एशए केला जाणार आहे. उमेदवाराला ऑफ-लेटर पाठवण्याचं कामही चॅटबॉक्स करणार आहे. ऑक्टोबर २०१९ रोजी बँकेनं परीक्षेद्वारे ३५० उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण निवड करण्याचं टारर्गेट ७०० लोकांचं आहे. त्यापैकी प्रायोगिक तत्वावर ३५० लोकांपैकी १५० लोकांची निवड या रोबोटने केली आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सध्या राबवला जात आहे. मात्र भविष्यात HR किंवा बॉस ऐवजी अशा प्रकारे जर रोबोट इंटरव्यू घेण्यासाठी आला तर आश्चर्य वाटायला नको.