सातव्या राष्ट्रीय तांग सुडो स्पर्धेत स्पोर्टस इंडिया काटे अकॅडमी [मीरा भाईंदर जिल्हा यांची दमदार कामगिरी


नाशिक दि. २६ (प्रतिनिधी) : आय टी एफ तांग सु डो फेडेरेशन ऑफ इंडिया तर्फे सातवी राष्ट्रीय तांग सु डो स्पर्धा दिनांक २४ ते २६ जानेवारी २०२० रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १७ राज्यातील ४५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत स्पोर्टस इंडिया कराटे अकॅडमी (मीरा भाईंदर जिल्हा) च्या स्पर्धकांनी १४ गोल्ड, १३ सिल्वर आणि १५ कांस्य पदकं पटकावली. कु. समर्थ वैभव तांबे याचा पदमश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते श्री सतपाल सिंग यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कस्तुरी सावंत-भोसले (२ गोल्ड), शुविधा कदम (२ सिल्वर), शुशांक कदम (२ कांस्य), करण पवार ( ३ सिल्वर), गौरव सावंत-भोसले (३ सिल्वर १ कांस्य ), शिवदिन यादव (१ गोल्ड २ सिल्वर) यांनी विशेष कामगिरी केली. सर्व स्पर्धकांची प्रशिक्षक श्री विनोद कदम सर (४ डिग्री ब्लॅक बेल्ट इंटरनॅशनल तांग सुडो फेडेरेशन USA) यांनी उत्तम तयारी करून घेतली होती. आश्रय ट्रस्टचे संस्थापक श्री दीपक नाईक यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील भविष्यासाठी शूभेच्छा दिल्या.