नरेंद्र मेहता यांनी केलेल्या महिलांच्या शोषण, छळाचा भाजप नगरसेविकेनेच केला पर्दाफाश


नीला सोन्स यांची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पत्राद्वारे न्याय देण्याची मागणी


भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या अनैतिक कृत्यांची माहिती माझ्याकडे आहे. त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली आहे. आता तर मला आणि माझ्या मुलाच्या जिवाला त्यांच्यापासून धोका आहे.



भाईंदर, दि. २५ (सा.वा.) - भाजपमध्ये महिला कशा असुरक्षित आहेत याचा पाढा भाजपच्या नगरसेविकेनेच आज वाचला. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता महिलांची छळवणूक करीत आहेत. त्यांच्याकडून मला व माझ्या मुलाच्या जिवाला धोका असल्याचा बॉम्बगोळाच भाजपच्या विद्यमान नगरसेविका नीला सोन्स यांनी टाकला आहे. तसे पत्र त्यांनी कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिले आहे. इतक्यावरच न थांबता नीला सोन्स यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून मेहता यांच्या महिलांबाबतच्या कारनाम्यांचा पंचनामा केला आहे.


___ मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक उद्या २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच धमाके होत आहेत. आज आणखी दोन व्हीडिओ व्हायरल झाले. आधी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत नरेंद्र मेहता अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेत बसले असून त्यांच्यासमोर एक महिलाही बसल्याचे दिसत आहे. त्यानंतर काही क्षणांतच दुसरा व्हीडिओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ भाजपच्या नगरसेविका नीला सोन्स यांनी व्हायरल केला. या व्हिडीओत त्या स्वत: नवी मुंबई येथील कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या दालनाबाहेर उभ्या असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओतून त्यांनी नरेंद्र मेहता यांनी केलेल्या त्यांच्या छळवणकीचा पाढा वाचला आहे. तसेच त्याबाबतचे पत्र विशेष पोलीस महानिरीक्षकांना देत असल्याचे सोन्स यांनी सांगितले.


वरिष्ठ नेत्यांनी कारवाई केली नाही, • 


• गेली काही वर्षे मी नरेंद्र मेहता यांच्या दहशतीमुळे मी अक्षरश: घाबरत काढली आहेत. मेहता भाजपच्या नावाआड कोणते अनैतिक धंदे करतात, महिलांचे कसे शोषण करतात, त्याचे स्टिंग ऑपरेशन करून व्हिडीओ काढले असल्याचा दावाही नीला सोन्स यांनी केला आहे. हे व्हिडीओ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे देऊन मेहतांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यापैकी काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर आता व्हायरल  झाले आहेत. ते काम कोणी केले हे मला माहीत नाही. परंत | मी आता मागे हटणार नाही. मला न्याय हवा आहे, असे , साकडे त्यांनी पत्राद्वारे पोलिसांना घातले आहे. मेहता यांच्याविरोधात | पोलीस आणि न्यायप्रक्रियेत मी ठामपणे लढणार आहे. मी | पुढाकार घेतल्यामुळे आजवर ज्या महिलांवर अन्याय झाला. ! त्याना बळ मिळेल. माझ्या लढ्यात तुम्ही साथ द्या. असे ! आवाहनही नीला सोन्स यांनी केले आहे. या घटनेनंतर । प्रतिक्रियेसाठी नरेंद्र मेहता यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न | केला. मात्र त्यांचा फोन नॉटरिचेबल होता. .