मुंबई : देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला तीव्र विरोध होत असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी घेतली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळं देशातील कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व । हिरावून घेतलं जाणार नाही. मात्र, महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही. एनआरसी लागू झाल्यास हिंदू आणि मुस्लीम अशा दोघांनाही नागरिकत्व सिद्ध करण्यात खूपच अडचणी येऊ शकतात. मी असं होऊ देणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा दिला. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आणि कधी सोडणारही नाही. महाराष्ट्रात आम्ही आघाडी केली आहे. याचा अर्थ आम्ही धर्म बदलला आहे असा होत नाही. विचारधारेशी कोणतीही तडजोड केली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. __“मी काय मागितले भाजपकडे? जे ठरले होते तेवढेच द्या. मी त्यांच्याकडे चांद-तारे मागितले होते काय?" असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपासोबत युती तोडण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले. "भारतीय जनता पक्ष शब्दाला जागला असता तर मी मुख्यमंत्री पदावर दिसलो नसतो. एखादा शिवसैनिक तेथे विराजमान झाला असता. पण हे त्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे!' असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला विशेष मुलाखत दिली असून, त्यामध्ये त्यांनी सरकार स्थापनेच्या घडामोडीपासून वादग्रस्त नागरिकता कायद्यापर्यंत, राहुल गांधींपासून अजित पवारांपर्यंत प्रत्येक प्रश्नावर उत्तरे दिली आहेत.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं
कधीच नव्हतं राज्याचा मुख्यमंत्री बनायच हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. मुख्यमंत्रीपद स्वीकारणं हा माझ्यासाठी धक्का नसला तरी माझं हे स्वप्न कधीच नव्हतं असे उद्धव ठाकरे सामनाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 'मी माझ्या वडिलांना बाळासाहेबांना वचन दिलं होतं. त्या वचनपूर्ततेसाठी मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं'
महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही
महाराष्ट्रात देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला तीव्र विरोध होत असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी राज्यात एनआरसी लाग होऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी घेतली.