अभिषेक नाला, कृष्णानगर नाल्याचा समावेश .कचरा रोखण्यासाठी अंधेरीतील दोन मोठे नाले बंदिस्त करणार!


 मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) - नाल्यांमध्ये रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने पावसाळ्यात पाण्याच्या निचरा होण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पालिकेने महत्त्वाचे मोठे नाले आच्छादित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अंधेरीतील अभिषेक नाला आणि कृष्णानगर नाला बंदिस्त करण्यात येणार आहे. मुंबईत अतिवृष्टीत येणार आहे. मुंबईत अतिवृष्टीत पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी पालिका नालेसफाईवर कोट्यवधीचा खर्च करते, मात्र झोपडपट्ट्यांमधून अनेक वेळा कचरा थेट नाल्यांमध्ये टाकला जातो. यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा समावेशही मोठ्या प्रमाणावर असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने अनेक भागांत पाणी साचण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर नाले बंदिस्त करण्याची मागणी नगरसेवकांमधून करण्यात येत होती. यानुसार पालिकेने नाल्यांवर घुमटाकार आच्छादन घालण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मरोळमधील रोनक सोसायटी येथील कृष्णानगर नाला आणि जुहू-वोवा लिंक रोड कल्व्हर्टपर्यंतचा अभिषेक नाला बंदिस्त करण्यात येणार आहे. या कामासाठी चार कोटींचा खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.


। मनुष्यबळ वापरून केल्या जाणाऱ्या नालेसफाईच्या ठिकाणी नाले बंदिस्त केले जाणार आहेत तर ज्या ठिकाणी नालेसफाईसाठी मशीन्सचा वापर होतो अशा ठिकाणी नाले आच्छादित केले जाणार नाहीत. या अर्धवर्तुळाकार घुमटामध्ये कारच्या बोनेटप्रमाणे दरवाजा उघडून सफाई करता येणार आहे.


 अंधेरीतील रौनक सोसायटी चर्चरोडवरील कृष्णानगर नाल्याचीलांबी ४८ मीटर आहे तर जुहू-वर्सेवा लिंक रोड कल्व्हर्टपासून ते एन. दत्ता मार्गपर्यंतचा अभिषेक नाला हा तब्बल ५९५ मीटर लांबीचा नाला आहे.