सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची। सुरू असलेल्या कामांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. मागील दीड | वर्षात ही परिस्थिती उद्भवली असून रस्त्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याने | ही कामे रखडली आहेत. हे लक्षात घेता सध्या सुरू असलेली कामे पूर्ण झाल्यानंतरच नवीन कामांना परवानगी दिली जाईल, अशी माहिती सार्वजनिक . बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच यासाठी ५ मार्च रोजी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. .... - पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, राज्यातील अनेक रस्त्यांची स्थिती ही खराब आहे ही वस्तुस्थिती आहे. ती | सुधारायची असेल तर राज्याच्या सर्वच भागांतील प्रमुख रस्त्यांचे ग्रीड करून ते दुरुस्त करावे लागतील. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून त्यासाठी कर्जउभारणी करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक | चव्हाण यांनी विधानसभेत केली.
टोल बंद केल्याने . पर्यायी मार्गाने पैसे उभारावे लागतील
टोल बंद करण्यात आल्याने तिजोरीवर भार आला आहे. त्याचसोबत कॉण्ट्रॅक्टरांचीही अडचण झाली आहे. सर्वांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा | लागेल. टोल बंद झाल्याने आलेला आर्थिक भार दूर करण्यासाठी अन्य मार्गाने पैसे | उभारावे लागतील, असेही अशोक चव्हाण म्हणाले.