शेतकऱ्यांना काळ्या गव्हाचे आकर्षण


इंदूर- मध्यप्रदेशात प्रथमच देपालपूरजवळील शाहपुरा नावाच्या गावातील शेतकरी सीताराम गहलोत काळ्या गव्हाची शेती करीत आहेत. हे वाण त्यांनी पंजाबच्या मोहाली येथील नॅशनल ॲग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमधून आणले आहे. आपल्या शेतात ते 'श्री विधी' या तंत्राने काळ्या गव्हाची पेरणी करीत आहेत. या गव्हात सामान्य गव्हाच्या तुलनेत अधिक प्रमाणात रोगप्रतिकारक क्षमता असते. तसेच हा गहू लठ्ठपणा, कर्करोग, मधुमेह, तणाव आणि हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी मदत करतो, असा संशोधकांचा दावा आहे. गहलोत यांनी सांगितले, या गव्हाचे वाण मिळवण्यासाठी मी गेल्या दोन वर्षांपासून एनएबीआयकडे फेऱ्या मारत होतो. अद्यापही तेथील केंद्रात या गव्हाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यामुळे पेरणीसाठी तो मिळणे कठीण होते. मात्र, यावेळी त्यांनी मला तो दिला; पण तो केवळ पाच किलोच आहे. हा गहू शेतात 'श्री विधी' या तंत्राने पेरला आहे. या तंत्राच्या सहाय्याने त्याचे उत्पादन वाढते. ॲ ग्रीकल्चर टेकॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सीच्या उपसंचालक शर्लिन था मस यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या गव्हाची श्री विधीने शेती केली तर उत्पादन क्षमता वाढते. 'ब्लॅक व्हीट' म्हणजेच काळा गहू शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मिळतो.