भाईदर. (प्रतिनिधी) - मिरा भाईदर परिवहन सेवा क्र. ०७, १४, २३ सुरु करा अशी लेखी मागणी मिरा भाईदर महानगरपालिका सभागृह नेता रोहिदास पाटील यांनी आयुक्त बालाजी खतगांवकर यांच्या कडे केली आहे.
यावेळी पाटील म्हणाले की, नागरिकांच्या येण्याजाण्याची सोय व्हावी म्हणून मिरा भाईंदर महानगरपालिकेने परिवहन सेवा सुरु केली पण वाढत्या नवीन नागरी वसाहत भागात परिवहन सेवा देणे आपले कर्तव्य आहे. गोल्डन नेस्ट ते काशिमिरा या हायवे च्या पूर्व भागात अर्थात सिनेमॅक्स परिसर, रामदेव पार्क, या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत वाढत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना रिक्षाचे भाडे परवडत नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यानुषंगाने परिवहन सेवा क्र. ०७, १४, व २३ सुरु करा असे पाटील यांनी सांगितले आहे. नागरिकांची सोय म्हणून मिरा भाईंदर परिवहन सेवा सुरु केली परंतु, मधल्या काळात परिवहन सेवा बस क्र. ०७, १४, व २३ या सेवा मनपा ने बंद केल्या. आज शहरात वाढती लोकसंख्या लक्ष्यात घेता . ०७, १४, २३ पूर्वरत सुरु होणे गरजेचे आहे. या सेवा बद्दल फक्त लवकर सुरु होईल असे सांगण्यात येते प्रतेक्षात मात्र सुरु होत _ नाही. आता पावसाळा संपला आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जोडणारी परिवहनची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. शालेय, महाविद्यालयीन, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्येच्या मंदिरात जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली परिवहन सेवा आहे. त्यामळे तिन्ही मार्गावरच्या बस सेवा सुरु होणे आवश्यक आहे असे पाटील यांनी सांगितले. बस क्र. ०७ हि भाईंदर पूर्व ते वर्सेवा ब्रिज पर्यंत, बस क्र. १४ हि भाईंदर पूर्व ते बोरीवली पूर्व मागाठणे पर्यंत तर बस क्र. २३ हि भाईंदर पूर्व ते रॉयल कॉलेज पर्यंत प्रवास करत होत्या. त्यामुळे सकाळी कार्यालय कडे जाणारे चाकरमानी, तर महाविद्यालयात जाणारे विद्यार्थ्यांना महाविद्यालात जाण्यासाठी तसेच परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी हि बस सेवा उपयोगी पडत होती, असे पाटील यांनी सांगितले. तर यावेळी परिवहन सेवा अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने म्हणाले की, याबाबत लवकरत लवकर योग्य निणय घेऊन केलेल्या मागणीनुसार बस सेवा सुरु करण्याचे आदेश देऊ असे सांगितले.