अंधेरीतील प्रवासी संख्या दोन वर्षांत दुप्पट


मुंबई- खासगी व सरकारी कार्यालयांची वाढती संख्या, मोठ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या रहिवासी इमारती, मेट्रो आदी कारणांमुळे गेल्या दोन वर्षांत पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातील प्रवासी भार दुपटीने वाढला आहे. अंधेरी स्थानकातील सोयीसुविधांच्या विस्तारासाठी पश्चिम रेल्वेने सोमवारपासून तीन दिवस केलेल्या सर्वेक्षणात या स्थानकात दररोज १३ लाख प्रवासी ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी सोमवारपासून तीन दिवस केलेल्या पश्चिम रेल्वेवरील अंधेरी व मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकाला मेट्रो जोडल्यापासून अंधेरीवरील भार वाढला; परंतु तो इतका वाढला असावा, याचा रेल्वेलाही अंदाज नव्हता. रेल्वेमंत्री पीयूष गोयल एका कार्यक्रमानिमित्त प्रवासी संख्या दोन मुंबईत आले असताना त्यांनी अंधेरी व घाटकोपर स्थानकातील वाढलेला प्रवासी भार पाहता या स्थानकाचे सर्वेक्षण करून सोयीसुविधांवर अधिक भर देण्याची सूचना रेल्वे प्रशासनाला केली होती. त्यानंतर पश्चिम रेल्वेने गेल्या सोमवारपासून तीन दिवस अंधेरी स्थानकातील सर्वेक्षण सुरू केले. यात प्रवासी संख्या, स्थानकातील सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला. त्यात १३ लाख प्रवासी या स्थानकातून ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले.


दोन वर्षांत दुप्पट अंधेरी स्थानकातून दररोज तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही २ लाख ५४ हजार एवढी आहे. तिकीटधारक व पासधारकांबरोबरच या स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांचीही भर पडलेली आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, सोयीसुविधांचा अधिक विस्तार करण्यासाठी अंधेरी स्थानकातील सर्वेक्षण हाती घेण्यात आले. प्रवासी संख्या मोजण्यासाठी स्थानकातील १२ प्रवेशद्वारांवर प्रत्येकी चार कर्मचारी सर्वेक्षणासाठी तैनात केले होते, तर प्रवाशांची मोजदाद करण्यासाठी फेस रीडिंग कॅमेराही बसवले. यातूनही प्रवासी संख्या भरमसाट वाढल्याचे समजले.