ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीतील अपघाती मृत्यूंचे प्रमाण २६ टक्क्यांनी कमी झाले आहे. अपघात कमी करण्यात ठाणे ग्रमीण पोलीस जिल्हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा ठरला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या अनुषंगाने डॉ. शिवाजी राठोड यांनीही वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल पवार व सहकारी वाहतूकपोलीसांचा सत्कार केला. रस्त्यांवर घडणाऱ्या अपघातांपैकी ८० टक्के अपघात हे मानवी चुकीमुळे होतात. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे, असे आवाहन ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी मिरा रोड येथे रस्ते सुरक्षा अभियानाच्या समारोप प्रसंगी केले. रस्ता सुरक्षा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ठाणे ग्रामीण पोलीसांच्या वतीने रस्ते अपघात रोखण्यासाठी विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली. सामाजिक संस्था , नागरिकांसह शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. शहरात जनजागृतीपर उर्वरित पथनाटय, सौंदर्य स्पर्धा, चित्रकला व वादविवाद पृष्ठ स्पर्धा, पदफेरीचे आयोजन करण्यात आले होते. वाहतुकीचे नियम व घ्यायची खबरदारी याबाबत माहितीपर फलक, पत्रके, पुस्तिकांद्वारे जनजागृती केली. विद्यार्थ्यांची नेआण करणाऱ्या शाळांच्या बसचालकांना मार्गदर्शन केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली , अशी माहिती ठाणे ग्रामीणचे वाहतूकपोलीस निरिक्षकअनिल पवार यांनी दिली. __ या अभियानाचा समारोप मिरा रोडच्या जीसीसी क्लबमध्ये झाला. यावेळी डॉ. शिवाजी राठोड म्हणाले की, वाढते रस्ते अपघात व त्यातून होणारे मृत्यु व अपंगत्व चिंताजनक आहे. त्यामुळे आपण स्वतःहून वाहतुकीची शिस्त लावून घेतली पाहिजे. आपल्या कुटुंबात , मुलांमध्ये जागरुकता आणली पाहिजे. अपघातात एकाचा मृत्युहोणे वा अपंगत्व येणे यामुळे संपुर्ण कुटुंब भरडले जात असते. अपघात घडला की, मग आपणास बचावाची संधी मिळत नाही . त्यामुळे वाहतुकीच्या आणि सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन आपण केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. । मद्यपान करुन वाहन चालवू नका, सीटबेल्ट लावा, वेगाची मर्यादा पाळा , बेदरकारपणे वाहन चालवू नका , ओव्हरटेकचा नाद सोडा , अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नका , सिग्नल वाहतुक नियम पाळा आदी सुचना त्यांनी केल्या. यावेळी अपर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, उपनिरीक्षकशांताराम वळवी व शशिकांत भोसले, पोलीस ठाण्यांचे प्रभारी उपस्थित होते. या अभियानात जनजागृती व विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेणाऱ्या संस्था , सामाजिक कार्यकर्ते , नागरिकांसह विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक सेवाभावी संस्थानी विविध कार्यक्रम राबवल्यामुळे ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षकडॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते सर्व संस्थेच्या संस्थापकांचा गौरव करण्यात आला. सदरप्रसंगी आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्टचे संस्थापक दिपक मोरेश्वर नाईक यांना रस्ता सुरक्षा अभियानाकरता वाहतुक जनजागृती कार्यक्रमात मोलाचे सहकार्यबद् दल प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्रातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यामागे ठाणे ग्रामीण पोलीस अग्रेसर