पालघरकरांच्या हाती कापडी पिशव्या. प्लास्टिक हटाओ। . शिवसेनेचा पुढाकार


पालघर, -- पर्यावरणाला घातक असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर सरकारने बंदी घातली आहे. असे असताना अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे केला जातो. याला आळा बसावा आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून शिवसेनेने पुढाकार घेत पालघरमध्ये कापडी पिशव्या वाटप केल्या आहेत. आतापर्यंत अशा हजारो पिशव्या देण्यात आल्या आहेत.


प्लॅस्टिकचा ब्रह्मराक्षस नष्ट व्हावा यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतल्यानंतर सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातली. आहे. याबाबत कडक नियमावलीही जाहीर करण्यात . आली आहे. या प्लॅस्टिकबंदी विरोधात शिवसेना महिला आघाडीने पालघर जिल्ह्यात जनजागृती सुरू केली असून त्यास उदंड प्रतिसाद मिळत आहे. आक्रमक विक्रमगड, मलवाडा येथील कस्तुरबा बालिका विद्यालयात मराठा सेवा संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्लॅस्टिक पिशवी वापरास आळा बसावा म्हणून सर्वच महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप पालघर जिल्हा संपर्कप्रमुख ममता चेंबूरकर यांच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी, अॅड. वैशाली डोळस, वैष्णवी रहाणे, मंजू कोंब, कस्तुरबा बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व शिक्षकवर्ग, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.