मुंबई- देशातील सवाधिक सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेले मुंबई शहर मुली-महिलांसाठी असुरक्षित बनू लागल्याचे धक्कादायक चित्र आहे. मुंबईत २०१८ १९ या वर्षात बलात्काराच्या घटनांमध्ये २२,तर विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये ५१ टक्के वाढ झाली आहे. बलात्काराच्या एकूण घटना पहिल्या,तर अत्याचार झालेल्या ६९ टक्के मुली या अल्पवयीन आहेत. विशेष म्हणजे, महिलांवर अत्याचार करणारे ९० टक्के आरोपी हे ओळखीचेच | असल्याची धक्कादायक बाब 'प्रजा फाऊंडेशन' या संस्थेच्या | अहवालातून समोर आली आहे. ___मुंबईतील एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीमधील गन्यांची आकडेवारीचा तपशील गुरुवारी 'प्रजा फाऊंडेशन'ने जाहीर केला. यामध्ये सोनसाखळी चोरी, घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये घट झाली असतानाच दुसरीकडे महिला अत्याचारांमध्ये | वाढ झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, अल्पवयीन मुले आणि मुली नराधमांचे बळी ठरण्याचे प्रमाण अधिक आहे. गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असताना दुसरीकडे त्यांची उकल होण्याचे प्रमाणही कमी होत आहे. मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक हे तपास अधिकारी म्हणून काम करीत असतात. मात्र, 'प्रजा'च्या आकडेवारीनुसार सहायक निरीक्षकांची ४१ टक्के तर उपनिरीक्षकांची २८ टक्के पदे रिक्त आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत विधिमंडळात आवाज उठवण्यात लोकप्रतिनिधी कमी पडत असल्याचेही 'प्रजा फाऊंडेशन'च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. सन २०१८-१९मध्ये आमदार राम कदम, राज पुरोहित आणि रमेश लटके यांनी गुन्ह्यांबाबत एकही प्रश्न सभागृहात उपस्थित केला नाही. सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत रमेश लटके यांनी केवळ पाच तर राम कदम यांनी अवघा एक प्रश्न उपस्थित केला आहे.
मुली, महिलांसाठी मुंबई असुरक्षितच!