ठाण्यात वाहनचालकांच्या बेशिस्तीला ब्रेक

ठाणे शहरात विशेषत नौपाडा, पाचपाखाडी, चरई यांसारख्या भागांत रस्त्याच्या कडेला मन मानेल त्या पद्धतीने वाहने उभे करत वाहतूक - कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून ही कारवाई करत असताना होणारे वाद टाळण्यासाठी अशा वाहनांचे छायाचित्र काढून त्यांना ई-चलानद्वारे दंड आकारला जात आहे.


जात आहे. नौपाडा तसेच आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर कोणत्या वेळेत कोठे वाहने उभी करावीत याविषयी ठरावीक नियमावली आहे. मात्र, अनेकदा या नियमावली आहे. मात्र, अनेकदा या नियमांची वाहनचालकांना माहिती नसते. तसेच या भागात पार्किंग धोरण आखण्याची तयारीही अनेक वर्षापासून महापालिका करीत आहे. ही नियमावली आणि त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागांची अंमलबजावणीही कागदावर आहे. तरीही वाहतूक पोलिसांनी आखून दिल्यानुसार सम-विषम पद्धतीची पार्किंग व्यवस्था आणि वेळा पाळणे वाहनचालकांना बंधनकारक आहे. असे असताना अनेक वाहनचालक या नियमांचे पालन करत नाहीत, असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. नौपाडा, गोखले रोड, ठाणे स्थानक परिसरात चारचाकी वाहनचालकांकडून बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. या वाहनांवर कारवाई करताना अनेकदा वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांमध्ये वाद होत असतात. या वादामुळे पोलिसांवर हल्ल्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे या परिसरात ई-चलान यंत्रणेची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी केली जात आहे. ई-चलान यंत्रणेद्वारे आकारण्यात येणारा दंड हा थेट वाहनचालकांच्या मोबाइल क्रमांकावर संदेशाद्वारे पाठवला जात आहेत. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या चालकाला दंड भरण्याव्यतिरिक्त पर्याय उरत नसल्याने वाहतूक पोलीसही समाधान व्यक्त करीत आहेत.