राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय मंडळ (मेडिकल, बोर्ड) स्थापन करण्यात येणार आहे. त्याचा जीआरही काढण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. याबाबतचा तारांकित प्रश्न सदस्य विलास पोतनीस यांनी उपस्थित केला. एका गर्भवतीच्या प्रकरणात वैद्यकीय अहवाल मिळण्यास वैद्यकीय मंडळाकडून उशीर होत असल्याने प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी वैद्यकीय मंडळ स्थापन करावे असे आदेश उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिले होते. याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली, अशी विचारणा पोतनीस यांनी प्रश्नाद्वारे केली. त्यावर उत्तर देताना वैद्यकीय मंडळाचा जीआर २४ जून २०१९ रोजी काढण्यात आल्याचे येपे यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय मंडळ