सार्वजनिक ठिकाणी घाण करणे अडीच हजाराहून अधिक नागरिकांना पडले महागात


पुणे- पुणे महानगरपालिकेच्या घणकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना | अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पालिकेकडून तब्बल २८५८ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५ लाख २९ हजार ६३५ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून अनेकदा अस्वच्छता पसरवली जाते. सार्वजनिक ठिकाणी धुंकणाऱ्यांची संख्या तर सवाधिक आहे. या अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांमुळे शहर विद्रुप होत असते. पुणे शहराचे घोषवाक्य हे स्वच्छ पुणे सुंदर पुणे असे आहे. त्यामुळे हे घोषवाक्य सत्यात उतरविण्यासाठी पुणे महानगरपालिका आता सज्ज झाली आहे. पालिकेकडून अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी थुकणे, कचरा फेकणे, लघवी करणे, शौचास बसणे आदी गोष्टींसाठी कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेकडून मोहिमच हाती घेण्यात आली असून प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. पालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्या १७१३ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ लाख ९७ ।। हजार १६५ इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच या सर्व नागरिकांकडून चक्क रस्ता साफ करुन घेण्यात आला. याच कालावधित सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्या ११०१ नागरिकांकडून तब्बल २ लाख २४ हजार ६६० इतका दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या ४२ जणांकडून ६ हजार ८१० तर शौचास बसणाऱ्या २ जणांकडून एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.