पनवेल- पाताळगंगा नदी आणि हेटवणे धरणातून येणाऱ्या जलवाहिनीतून दिवसाला साडेतीन लाख लिटर पाणीचोरी होत असल्याची धक्कादायक बाब यापूर्वीच समोर आली आहे. असे असले तरी या चोरीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे पनवेल शहर व सिडको नोडला सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. कळंबोलीत ही समस्या सध्या गंभीर झाली आहे.
जलवाहिन्या फोडून पाणीचोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिसरात कमी दाबाने काही जण हे पाणी व्यावसायिक वापरासाठी वापरत आहेत. उपाहारगृह व बाटलीबंद पाण्यासाठीही ही पाणीचोरी होत आहे. कळंबोली व करंजाडे परिसरात या जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. जलवाहिनी फोडून पाणीचोरी करून विकणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. खारघर, कळंबोली, तळोजा, खारघर, कळंबोली, तळोजा, नावडे, कामोठे, नवीन पनवेल (पूर्वे दाबाने पाणी -पश्चिम) जने पनवेल आणि २९ गावांना सुमारे २९५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे मात्र केवळ २०९ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. त्या सद्य:स्थितीत पनवेल पालिका क्षेत्रात ८६ दशलक्ष लिटर पाणीटंचाई जाणवत आहे. पनवेलमध्ये येणाऱ्या जलवाहिनीतन दररोज ३५ दशलक्ष लिटर अर्थात साडेतीन लाख लिटर पाण्याची चोरी होत आहे.