वीज ग्राहकाना मिळणार दिलासा
आजवर वीज दरवाढीचा शॉक सहन करणाऱ्या राज्यातल्या जनतेला महाविकास आघाडी सरकार लवकरच आनंदाचा धक्का देणारंय. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तसे संकेत खुद्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेत. महावितरणसह त्यांच्या तिनही वीज कंपन्यांना खर्चात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आजवर वीज दरवाढीचा शॉ क सहन करणाऱ्या राज्यातल्या जनतेला महाविकास आघाडी सरकार लवकरच आनंदाचा धक्का देणारंय. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तसे संकेत खुद्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेत. महावितरणसह त्यांच्या तिनही वीज कंपन्यांना खर्चात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्याच्या घडीला महावितरणनं ५९२७ कोटींच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे दिलाय. त्यावर लवकरच एमईआरसीमार्फत निर्णय घेतला जाईल. मात्र ही दरवाढ जनतेवर लादली तर सरकारविरोधात नाराजीचा सूर निर्माण होईल. त्यामुळे या दरवाढीपूर्वीच १०० यूनिटपर्यत वीज मोफत देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. आता त्यावर निर्णय होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल.