रिसॉर्ट, मनोरंजन पार्क चालकांची झोप उडणार. वीज पुरवठ्याची महावितरण घेणार झाडाझडती .एकापेक्षा जास्त कनेक्शनमधून आर्थिक गंडा


मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी)राज्यातील रिसॉर्ट, मनोरंजन पार्क चालकांची आता झोप उडणार आहे. रिसॉर्टचालक हे व्यावसायिक ग्राहक असून त्यांना एकाच | वीज मीटरच्या माध्यमातून वीज पुरवठा घेणे अवश्यक आहे. पण वीज कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वेगवेगळ्या ग्राहक गटातून ते एकापेक्षा जास्त कनेक्शन घेत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे त्यांचा वीज वापर कमी नोंदला जात असून महावितरणला आर्थिक नुकसान होत आहे. त्यासाठी आता सर्वच रिसॉर्ट, मनोरंजन पार्कची झाडाझडती घेण्याचा निर्णय | महावितरणने घेतला आहे. ___ व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना जादा दराने वीज पुरवठा केला असून त्यांचा वीज वापर जसा वाढेल तशी त्यांच्या वीजदरात वाढ होते. त्यामुळे रेस्टॉरंट, रूम, जीम, स्पा अशा विविध नावांनी एकापेक्षा जास्त वीज कनेक्शन घेऊन आपला वीज वापर विभागन दाखवला जातो. याची गंभीर दखल घेत व्यवस्थापनाने राज्यातील प्रत्येक रिसॉर्ट आणि मनोरंजन पार्कला किती वीज कनेक्शनच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो याची तपासणी करून अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. 


एकापेक्षा जास्त कनेक्शन देणाऱ्यांची खैर नाही


नियम धाब्यावर बसवून एकाच रिसॉर्ट किंवा मनोरंजन पार्कला एकापेक्षा जास्त कनेक्शन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.