ओळखपत्राच्या पुराव्याशिवाय 'असं' काढा आधार कार्ड


 मुंबई: आधार ओळखपत्र हे आता एक महत्त्वाचं कागदपत्र बनलं आहे. पॅ न कार्डासाठी अर्ज करायचा असो की आयकर परतावा भरायचा असो किंवा कुठलंही सरकारी अनुदान घ्यायचं असो, त्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्ड तयार करण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र आदि अधिकृत ओळखपत्राचा पुरावा द्यावा लागतो. पण असं कोणतंही कागदपत्र नसेल तर आधारकार्ड कसं काढायचं?


 आधार एनरोलमेंट फॉर्मनुसार, जर कोणाकडे फफ ऑ फ आयडेंटिफिकेशनसाठी कागदपत्र नसेल तरी ती व्यक्ती आधार कार्डासाठी अर्ज करू शकते. त्यासाठी एकतर कोणी परिचयदाता किंवा कुटुंबातील सदस्याची आवश्यकता असते.  जर कोणाकडे अधिकृत ओळखपत्राचा पुरावा नसेल तरी तो आधार कार्डीसाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी त्याचं नाव त्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका कागदपत्रावर असावं लागतं. उदाहरणार्थ, रेशन कार्ड (शिधापत्रिका). पण यासाठी हे अनिवार्य आहे की आधी कुटुंबप्रमुखाने आधार कार्ड बनवावं. त्यानंतर तो प्रमुख कुटुंबातील इतर सदस्यांचा परिचयदाता होऊ शकतो. परिचयदात्याने आपलं ओळखपत्र सोबत घेऊन जावं. केंद्रावर तो सदस्यही स्वत: उपस्थित हवा. दोघांमधील नातं दाखवणारं कोणतंही कागदपत्र हवं. या नात्याच्या पुराव्यासाठी पुढील विविध प्रकारच्या कागदपत्रांची यादी सरकारने दिलेली आहे.