भारतात रोज २५ हजार टन प्लास्टिकचा कचरा


नागपूर : भारतात प्लास्टिकच्या वापराला बंदी घालण्यात आली असली तरीही दररोज २५ हजार टनांहून अधिक प्लास्टिकचा कचरा येथे तयार होतो. त्यातील ४० टक्केही कचरा गोळा केला जात नाही. तो वातावरणात तसाच पडून राहतो. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेच शुक्रवारी याची कबुली दिल्याने प्लास्टिकबंदीचा पुरता फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.


सततच्या आर्थिक विकासामुळे ग्राहकांची वस्तूंची मागणी वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्लास्टिकचा वापरही वाढत आहे. वस्तूंचे सुरक्षित पॅकेजिंग आणि कमी किमतींमुळे प्लास्टिकचा वापर केला जातो. प्लास्टिकला हरित पर्याय शोधणे हेदेखील एक आव्हान आहे. केंद्राने प्लास्टिकबंदीसाठी नियम तयार केले आणि प्लास्टिकबंदी केली, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. पुनर्नवीकरण केलेले प्लास्टिक अनेक उत्पादनांच्या निर्मितीसाठी वापरले जाते. उवरित दहा हजार ५५६ टन प्लास्टिक कचरा वाया जातो, तो एकूण कचऱ्याच्या ४० टक्के इतका आहे.