अंधेरी साईवाडी येथे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा संपन्न


आश्रय ट्रस्ट संलग्न सिनिअर सिटीझन सोशल राईट्स फाऊंडेशनच्या वतीने साईवाडी अंधेरी येथे मागील पाच वर्षा 'पासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी स्थानिक जेष्ठ नागरिकांचा सन्मान विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींच्या हस्ते करण्यात  येतात. यावेळी प्रमुख पाहूणे अंधेरी पोलीस ठाण्याचे प्रकाश बंडगर उपस्थित होते. या सोहळयाचे नियोजन संस्थापक दिपक मोरेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाने संस्थेचे उपसचिव संतोष चौधर हे करतात. व याचे अतिशय चांगले नियोजन संतोष चौधर यांच्या वतीने प्रत्येक महिन्याला करण्यात येते. अंधेरी कमिटीचे अध्यक्ष तुकाबाई चौधर यांच्यामार्फत जेष्ठ नागरिकांना अल्पोहाराची व्यवस्था विविध दानशूर व्यक्तींच्या मदतीने करण्यात येते. जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या वंचित असलेल्या नागरिकांना एकत्र आणण्याचे काम जेष्ठ पत्रकार अनंत दाभोळकर ,पंढरीनाथ खंडागळे (निवृत्त पोलीस ऑफीसर), किसन शेवाळे, वासुदेव पाष्टे, उदय देशमुख , काशिराम मांडवकर , महादेव पारदळे, राजराम चव्हाण , शशिकांत बंड, दिलीप प्रभु, दिपकमहाडिक, हरिश्चंद्र रेवाळे इत्यादी मंडळी करीत आहेत. इमरतीच्य्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ८०० ते ९०० सदस्य असलेल्या या संस्थेला अजुनही विरंगुळा केंद्रासाठी सरकारने जागा उपलब्ध करुन दिली नाही याबददल खेद वाटतो.