डोंबिवली . महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये होणारी घुसखोरी थांबायलाच हवी. ती रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कमी पडत असून हजारो रुपये खर्च करूनही आम्हाला आरामदायक प्रवास मिळत नाही. त्यासाठी रेल्वे प्रशासनाएवढेच महिला प्रवासीही जबाबदार आहेत. सेकंड क्लासचे प्रवासी बिनधास्त फर्स्ट क्लासच्या डब्यात चढतात. त्यांना सांगूनही त्या खाली उतरत नाहीत. असे प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांची अडचण होते. रोजच्या प्रवासात भांडणे, कटकटींचे प्रकार वाढले आहेत. याला रेल्वे प्रशासन आळा घालू शकते, पण इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
प्रथम श्रेणीच्या डब्यात सेकंड क्लासच्या महिलांची घुसखोरी