राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी सुसंगत नसून, वास्तवाचे भान हरपलेला आहे. देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्यांना स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा असा हा अर्थसंकल्प असल्याची बोचरी टीका मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
IDBI आणि थ्ामधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय, रेल्वेचे खाजगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवतात तसेच काही शासकीय बॉण्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला गेला आहे, तो ही ही काळजी वाढवणारा आहे. २०३० मध्ये भारत हा सर्वात युवा देश संकल्प होणार असून या युवा शक्तीच्या हाताला वित्तीय रोजगार देण्याचा कोणताही ठोस मार्ग या अर्थसंकल्पातून विकसित होतांना दिसत तरतूद नाही. पर्यटन क्षेत्र ज्यातून मोठ्या रोजगार संधी निर्माण होतात, त्यासाठी अत्यंत कमी तरतूद करण्यात आली आहे. म्हणायला शेती क्षेत्रासाठी १६ सुत्री कार्यक्रम रुपयांपर्यंतच्या जाहीर करून रु. २.८३लाख कोटींची तरतूद या क्षेत्राला उपलब्ध केली.प्रत्यक्षात केल्याचे ही तरतूद मागच्या वर्षीपेक्षा थोडीच वाढली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातून व्यक्त केलेले संकल्प व त्याच्या सिद्धीसाठी केलेल्या वित्तीय तरतूदी यात विरोधाभास दिसतो. महिला व बालविकासासाठी भरीव तरतूद अपेक्षित होती.ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग लोकांच्या हितासाठी देखील फारसे काही केलेले दिसत नाही.नाही म्हणायला अर्थमंत्र्यांनी बँकातील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीला विमा संरक्षण देऊन सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचे प्रयत्न केल्याचे दिसते.