ध्येय-उद्दिष्टापासून दूर चाललेली आजची पत्रकारिता


पूर्वीची ध्येयवादी पत्रकारिता आज राहिलेली नाही, हे वृत्तपत्रातील लेखनातून सहजी दिसून येते. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात या वृत्तपत्रांचे फार मोलाचे स्थान आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोतिबा फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नाटय़ाचार्य कृ. प्र. खाडिलकर अशा अनेक मंडळींनी ब्रिटिशांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रांचा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेतला. त्यावेळचे या पत्रकार नेत्यांचे लेख वाचण्यासाठी वृत्तपत्रांवर वाचकांच्या उडया पडत. संपादक हा वृत्तपत्राचा कणा असतो. वृत्तपत्रात येणा-या सर्व प्रकारच्या मजकुराला हाच जबाबदार असतो. त्याच्या लेखनामध्ये समाजमन बदलण्याची शक्ती असते. स्वातंत्र्यानंतर १९७० पर्यंतचा भारतीय पत्रकारितेचा काळ हा विकसनशील पत्रकारितेचा काळ मानला जातो. प्रसिद्धीची, छपाईची साधने नसताना, वितरण व्यवस्था नसतानाही त्या काळी जास्तीत- जास्त वाचकांपर्यंत वर्तमानपत्र पोहोचवण्याची संपादकांची सतत धडपड असे. कार्यकर्ते हेच संपादक असल्याने समाजाचे वास्तव चित्र वृत्तपत्रात पाहायला मिळे. वृत्तपत्रावर वाचकांचा खूप विश्वास होता. वृत्तपत्रात बातमी आली म्हणजे, ती शंभर टक्के खरी असणारच अशी श्रद्धा समाजात होती. वृत्तपत्रात व्यक्तीचे नाव प्रसिद्ध होणे हे समाजात फार मोठे अप्रूप होते, छायाचित्रासाठी शिष्याचे बॉक बनवावे लागत. ते काम खर्चिक असल्याने वृत्तपत्रात फोटो फार कमी प्रसिद्ध होत. त्यामुळे पाने भरण्यासाठी मजकुराला अधिक स्थान मिळे. त्यामुळे विविध लेखन प्रकाराचा, शुद्धलेखनावर अधिक लक्ष असलेला, दर्जेदार मजकूर देण्याची संपादकांची धडपड चाले. वृत्तपत्रात लेखन करणा- यांना समाजात अधिक मान असे. वृत्तपत्र हे एक ध्येय म्हणून चालवले जात असे. आज ही परिस्थिती राहिलेली नाही. आज वृत्तपत्र हे एक धंदा म्हणून चालवले जाते. त्यात काही चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, वृत्तपत्रातून काही उत्पन्न मिळाले नाही, तर वृत्तपत्राचा खर्च कसा भागवायचा? कर्मचा-यांचे पगार कोठून द्यायचे, असा प्रश्न निर्माण केला जातो. त्यालाही काही मर्यादा असतात. पूर्वी त्या होत्या. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात आमूलाग्र असे बदल झाले आहेत. या व्यवसायाकडे अलीकडे फक्त अर्थार्जन म्हणूनच पहिले जात असल्याने नीतिमत्ता राहिलेली नाही. विश्वासाहता संपुष्टात आली. या सर्वातून 'पाकीट पत्रकारिता' निर्माण झाली. जाहिराती मिळवण्यासाठी भल्या-बु-या मार्गाचे लेखन सुरू झाले. निवडणुका किंवा मोठे कार्यक्रम यांच्या बातम्यांना काही प्रमाणात पीतपत्रकारितेचे स्वरूप प्राप्त झाले. निवडणुकीच्या काळात तर काही राजकीय पक्षांनीच बांधून घेऊन त्यांच्या प्रचाराचे काम संपादक:घेतले. यामुळे राजकीय (दिपक गोरेश्वर बाईक स्वरूपाचे वास्तव चित्र वाचकाला मिळेनासे झाले. यातून वृत्तपत्रांची म्हणण्यापेक्षा त्यांच्या मालकांची आर्थिक बाजू भक्कम होऊन संपादकांचे लेखन, विचार स्वातंत्र्य संपुष्टात आले. ते सांगकामे बनले. या सर्व परिस्थितीने वृत्तपत्रापासून दर्दी, वाचनाची आवड असणारा जिज्ञासू वाचक दूर झाला. इंग्रजी वृत्तपत्रे त्यामानाने आज बरी निघतात. पण, मराठी वृत्तपत्रांचे दिवस मात्र खराबच म्हटले पाहिजेत. संपादकांना पूर्वीसारखे लेखन स्वातंत्र्य नाहीच. पण, मालकांनी दिलेले जाहिरातीचे 'टार्गेट' पूर्ण करावे लागते. त्यामुळे त्यांना स्वत:लाही नि:पक्षपातीपणे लेखन करता येत नाही. आपल्या वार्ताहरांची व्यावसायिक नीतिमत्ता जपणे कठीण जात आहे. जो जास्त जाहिराती आणतो, त्याला वृत्तपत्रात मानाचे स्थान मिळते. अनेक पुरस्कारांनी गौरवले जाते. पत्रकार म्हटला, तर किमान बातमी तरी समजली पाहिजे? लिहिण्याचे कसब सर्वानाच असते असे नाही, पण त्याने दिलेला मजकूर वाचकाला समजायला हवा. पूर्वी अनुभवातून पत्रकार-लेखक तयार होत. मराठी पत्रकारितेत आजही अभ्यासू लोक आहेत, पण ते फक्त आपल्यापुरताच विचार करताना दिसतात. नव्या पिढीशी जवळीक साधण्याचा, त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करताना ते दिसत नाहीत. त्याचप्रमाणे नव्या पिढीलाही त्यांचे मार्गदर्शन घ्यावेसे वाटत नसल्याने, मीच श्रेष्ठ पत्रकार ही वृत्ती या क्षेत्रात वाढत आहे. यामुळे आज पत्रकारितेचे खच्चीकरण होत असून, वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांत 'टोपल्या टाकू' पत्रकारांची संख्या वाढत आहे. पत्रकार संघटनातही राजकारण शिरलेले दिसते. उच्चपदे किती वर्षे आपल्याकडे ठेवता येतील, त्यातून व्यक्तिगत लाभ घेता येतील, यासाठी काही पत्रकारांची धडपड सुरू असलेली दिसते. त्यातून राजकीय नेते जरी केवळ एक गरज म्हणून पत्रकारांना जवळ करीत असले तरी, सामान्य वाचक मात्र पत्रकारापासून दूर होत असल्याचे चित्र सध्या पत्रकारितेत दिसत आहे.