मीरा भाईंदर पूर्व येथील धर्म काटा जवळ स्थित असणाऱ्या कस्तुरी इंडस्ट्रियल इस्टेटचा सर्व कचरा वारंवार रस्त्यावर फेकण्यात आल्याने जवळपासच्या सर्व परीसरात दुर्गधीचे वातावरण निर्माण झालेले आहे...हा परीसर महानगरपालिकेने संपूर्णपणे दुलक्षित केल्याने नागरीक त्रस्त असून सगळ्यांमध्ये संतापाची लाट आहे...अनधिकृत रीत्या मोठे ट्रक आणि अवैध्य गाड्यांच्या पार्किंग मुळे आणि कचऱ्याच्या साम्राज्यामुळे रस्त्यावर चालण्याची ही नामुष्की येथील लोकांवर आलेली आहे.
सदर परिसरातील सर्व जबाबदार नेते मंडळी आपले मोठ मोठे पोस्टर व बॅनर लावण्यात अतिशय व्यस्त असल्यामुळे इथे उद्भवलेल्या या भीषण परिस्थितीचा आढावा नेमके कोणी घेईल की नाही हा एक गंभीर प्रश्न आहे. येथील लोकप्रतिनिधींनी एका ठिकाणी 'स्वछ मीरा भाईंदर, सुंदर मीरा भाईंदर' चे नारे निवडणुकीच्या रणधुमाळीत दिले आणि निवडणुका संपताच पुन्हा सर्व पूर्वपदावर येताना दिसत आहे. थोडक्यात काय तर सामान्य जनतेच्या मनात कायम निराशेची भावना निर्माण होणार....वेळीच महानगरपालिका व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी येथील सामान्य जनतेची इच्छा आहे.