स्वच्छ सुंदर मिरा-भाईंदर आपले शहर


मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे मिरा भाईंदर नवघर रोड स्थित सचिन तेंडुलकर मैदानाची दुर्दशा पहायला मिळते. येथे जवळच पोलिस चौकी असतानाही सदर परिसरात स्थानिक लहान मुलांना , जेष्ठ नागरीकांना परीसरात वावरणे धोकादायक बनले आहे. दिवसाढवळया सदर मैदानात गर्दुले येथे दहशत माजवत आहेत. येथे काही व्यसनी मुले मुली राजरोसपणे चरस अफू गांजा तसेच दारु पिताना दृष्टीस पडतात. सतत गजबजलेल्या या परिसरात नशा करणाऱ्या मुलांची संख्या मोठया प्रमाणात पहावयास मिळते. येथे पोलिसांचा कोणताही पहारा नसतो यामुळे सदरच्या मैदानात मुलांना खेळण्यासाठी जागा मिळत नाही.यातच नगरपालिका लक्ष घालत नाही. सोशल राईट्स संस्थेमार्फत अनेक वेळा तक्रारी करुनही दुर्लक्ष करण्यात येते. विशेष म्हणजे नशा करणारी मुले स्थानिक नसून बाहेरु न येथे येतात. व सदर मैदानात दारुच्या बाटल्या फोडून विकृती असल्यासारखे काचा पसरवून जातात . हा प्रकार मागील एक वर्षांपासून राजरोसपणे सुरु आहे. याकडे पोलिसांचे लक्ष नाही तसेच कोणती कारवाई नाही . येथील स्थानिक लोकांनी अनेकवेळा तक्रारी करुनही कोणीही दाद देत नाही. मिरा भाईंदरला खेळण्याचे मैदान सुरक्षित नाही. याउलट मैदाने टेंडरवर आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्याचा सपाटा लागला आहे. लोकार्पण केलेल्या मैदानावर महानगरपालिकेने पैसे कमवण्याचा धंदा सुरु केला आहे. अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक मंडळी करतात. राजकरणी लोक येथे फिरकतानाही दिसत नाही. येथे गटबाजी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे स्थानिक मंडळी बोलण्यास घाबरतात. नशा करणाऱ्या मुलांकडून येथील स्थानिकच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.