जिद्दी मराठा समोर नमले प्रशासन आंदोलनानंतर मैदानाबाहेर पालिकेने लावला फलक



भाईंदर : महापालिकेच्या खेळाच्या मैदानाबाहेर फलक लावण्याची कार्य वाही केली असून अन्य आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी समिती नेमणे व आरजी जागेतील अतिक्रमणांवर कारवाई करणे अशी आश्वासने मिळाल्याने याबाबत सुरु असलेले जिद्दी मराठा संस्थानी शुक्रवारी उपोषण मागे घेतले. मिरा भाईंदर मधील अनेक  आरक्षित जागा धन दांडग्या बिल्डरांकडे तसेच लोक  प्रतिनिधीच्या ताब्यात आहेत. यातीलच एक मैदान भाईंदर पुर्वेच्या सेवन स्क्वेअर शाळेमागे महापालिकेचे २४६ क्रमांकाचे मैदानासाठी आरक्षण आहे. या आरक्षणाचे २० हजार चौ. मी. क्षेत्रफळ असले तरी महापालीका मात्र २१ हजार चौ. मी. क्षेत्रफळ ताब्यात असल्याचे सांगते. परंतू विकास आराखडयातील या आरक्षणाचा नकश पाहिल्यास सेवन स्क्वेअर शाळेच्या मागे सेवन इलेव्हन कंपनीने आपले कुंपण घालून त्याचा खाजगी वापर चालवला असल्याच्या तक्रारी आहेत. हि जागा टी.डी.आर चा मोबदला देऊन ताब्यात घेण्यासह यात झालेले बेकायदा बांधकाम व अतिक्रमण हटवण्याची मागणी जिद्दी मराठाचे प्रदिप जंगम , आम आदमीचे ब्रिजेश शर्मा |, सत्यकामचे कृष्णा गुप्ता आदींनी केली आहे. तर पालिकेकडून कारवाई सोडाच उलट नगरसेवकांनी ठरवलेल्या महासभेतील धारेणानुसार खेळाच्या मैदानाची आरक्षणाची जागाच विकासकाच्या घशात घालण्याचा घाट पालीकेने चालवला आहे. हे आरक्षण खेळण्यासाठी खुले करावे यासह अन्य आरक्षणाच्या जमिनी ताब्यात घेणे व शहरातील वसाहतीमधील आर जी जागेतील अतिक्रमण हटवणे आदी मागण्यांसाठी उपोषणास सुरुवात करण्यात आली होती. यावेळी आयुक्त बालाजी खतगावकर, , शहर अभियंता शिवाजी बारकुंड , व कार्यकारी अभियंता दिपक खंबीत यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. आरक्षणाच्या जागा ताब्यात घेण्यासाठी समीती नेमण्याचे तसेच आरजी च्या भुखंडावरील आक्रमण हटवण्याच्या कार्य वाहीचे आश्वासन देण्यात आले. तसेच आरक्षण क्रमांक२४६ येथे महापालीकेचे खेळाचे मैदान असा फलक लावण्यात आला. त्यानंतर आंदोलकांनी आपले उपोषण मागे घेतले. विशेष बाब म्हणजे महापालिकेला आपला हक्कमिळवून देण्यासाठी विविध संघटनांनी आपला मोल्यवान वेळ देऊन उपोषण, आंदोलन करणे असे कार्यक्रम राबवणे हे कितपत योग्य आहे अशी चर्चा जनसामान्यात केली जाते. महानगरपालिकेच्या कानाडोळा केल्याने परप्रांतियांचे फावते असेच पाहण्यात आले आहे.