घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण अरवेर सुरू, आमदारांकडून पाहणी


ठाणे : मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम अखेर सुरू झाले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या किल्ल्यात जाऊन पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह किल्ल्यातील कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी आणखी काही कामांची सूचना केली. किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी ८१ लाखांचा खर्च अंदाजित आहे. दुसरीकडे गुरुवारी सरनाईक यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या किल्ल्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी बदलही सुचवले आहेत. यामध्ये घोडबंदर किल्ल्याच्या मूळ अस्तित्वाला धोका न पोहोचवता काम होणार आहे. पुरातत्त्व , आमदारांकडून विभागाने केलेल्या सूचनेनुसार काम सुरू आहे. येथील दुरुस्ती झाल्यानंतर किल्ल्याच्या मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांना बसता येईल, यासाठी जागा तयार करण्यात यावी, घोडबंदर किल्लाच नव्हे तर महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे महत्त्व येथे येणाऱ्यांना समजावे, किल्ल्यात येणाऱ्यांना एकत्र बसून चर्चा करता यावी, यासाठी बैठकीची जागा, किल्ल्याच्या बुरु जाला लागून नैसर्गिक खडक आहे. त्या मोठ्या खडकावर झाडे उगवली आमदारांकडून पाहणी आहेत. किल्ल्याचे सुशोभीकरण होत असताना येथील नैसर्गिक वातावरणात शोभिवंत फुलझाडे या खडकावर लावावीत, तसेच या किल्ल्यात असलेल्या हौदात म्युझिकल फाउंटन लावण्यात यावा, असेही सांगण्यात आले आहे. घोडबंदर किल्ल्याजवळ खाली डोंगरकडा आहे. नैसर्गिक पद्धतीने हा कडा कापून अॅम्पी थिएटरप्रमाणे त्यावर बसण्याची व्यवस्था करावी, ती करीत असताना येथे काळे दगड लावण्यात यावीत. याठिकाणी १००-१५० पर्यटक बसू शकतील, अशी व्यवस्था व्हायला हवी. या नैसर्गिक उतारावर बसण्याची सोय केल्यास येथे बसून पर्यटक म्युझिकल फाउंटन, लॅण्डस्केपिंग केलेले गार्डन, किल्ला पाहू शकतील, असे सरनाईक म्हणाले.