वांद्रे-वरळी सी लिंकवर राजीव गांधी सागरी सेत् (वांद्रे - वरळी सागरी सेतू) पथकर नाक्यावर शुक्रवारी फास्टॅग प्रणाली कायान्वित करण्यात आली. फास्टॅग प्रणालीने परिपूर्ण असलेला हा मुंबईतील पहिला पथकर नाका ठरला आहे. राज्यभरातील फास्टॅग प्रणालीसाठी पथकर नाक्यांवर पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नियुक्ती केली आहे. त्याअंतर्गत मुंबईतील राजीव गांधी सागरी सेतूवर शुक्रवारी फास्टॅग प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला. सागरी सेतच्या पथकर नाक्यावर एकूण १६ मार्गिका आहेत. पहिल्या टप्यात पथकर नाक्यावरील सहा मार्गिका ह्या फास्टॅग वाहनधारकांसाठी राखीव असतील. पुढील काही दिवसांमध्ये आणखी सहा मार्गिका फास्टॅगमध्ये रुपांतरीत करण्यात येतील. उवरित चार मार्गिका ह्या रोख भरणा म्हणून राहतील. 'सागरी सेतूवरील पथकर नाक्यावरील फास्टॅग प्रणालीमुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होईल. नाक्यावर रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. मुंबईतील इतर पथकर नाक्यावर ही प्रणाली कायान्वित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे', असे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.
वांद्रे-वरळी सी लिंकवर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित