ऑनलाइन इटरनेट हँडलिग चाजेसच्या नावाखाली उकळला जाणारा पैसा हा ऑनलाइन तिकीट अॅप कंपन्यांना जमा होत आहे. कोणत्याही बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्डवरून हे शुल्क वजा होत आहे. वास्तविक हे वजा झालेले शुल्क चित्रपटगृहांनी देणे अपेक्षित आहे. मात्र यावर बॅकांचाही वचक नाही. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष विजय सगर म्हणाले, "इंटरनेट हॅडलिंग चार्जेसच्या नावाखाली पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. वास्तविक हे शुल्क चित्रपटगृहांनी भरणे आवश्यक आहे. याविषयी अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. मात्र आता सरकारला या कंपन्याविरोधात लेखी पत्र देणार आहोत. यातही पारदर्शकता असणे आवश्यक आहे. कंपन्यांची ही मोनोपॉली आहे. डिजिटलच्या नावाखाली नागरिकांची लूट सुरू आहे.'
ऑनलाइन तिकीट वेळेची बचत आणि रांगेत उभे राहण्यापेक्षा विविध अॅपच्या माध्यमातून चित्रपटप्रेमी ऑनलाइन तिकीट बुक करतात. मात्र त्यांना तिकीट दराच्या व्यतिरिक्त 'इंटरनेट हॅडलिंग चार्जेस'च्या नावाखाली दहा टक्के भुर्दंड सहन करावा : लागतो. या अतिरिक्त शुल्कासाठी wecame kr thanks कोणतीही अधिकृत नियमावली नसताना नागरिकांची दिशाभूल 1 करून खासगी कंपन्यांकडून - आर्थिक लूट केली जात आहे. -- - सध्याच्या धकाधकीच्या जीवनात युवा वर्गाकडून चित्रपटाचे ऑ नलाइन तिकीट बुक करण्याकडे कल वाढत आहे. यातून बुकिंग करणाऱ्या कंपन्यांना लाखो रुपयांची कमाई होत आहे. सजग नागरिक मात्र चित्रपटगृहात याविषयी बुकिंगमधून आवाज उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र नेमकी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. इंटरनेट हॅडलिंग thanks taram - चार्जेसची कोणतीही अधिकृत शासकीय नियमावली नाही. प्रत्येक तिकीट बुकिंगच्या मागे ऑनलाइन दहा टक्के रक्कम खासगी कंपन्यांकडून आकारली जात आहे. याशिवाय प्रत्येक चित्रपटगृहात तिकिटाचे दरही वेगवेगळे आहेत. त्यामळे इंटरनेट हँडलिंग चार्जेसही वेगवेगळे आकारले जात आहेत. यासाठी ठराविक शुल्क नाही. - ऑनलाइन बुकिंग इंटरनेट जादा शुल्क आकारण्याविरोधात ग्राहकांनी समोर येऊन आवाज उठविणे अपेक्षित आहे. ऑनलाइन कंपन्या या माध्यमातून बक्कळ पैसा कमवत आहेत. रसिकांना जादा पैशाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ग्राहकांना सुविधा हव्या आहेत; मात्र या सुविधांचा गैरवापर नको. एकीकडे डिजिटल इंडियाकडे वाटचाल हवी, असा नारा दिला जातो. दुसरीकडे लूट सुरू आहे. चित्रपटगृहांकडे याकरिता स्वत:ची सक्षम यंत्रणा हवी. सध्या या ऑनलाइन बुकिंगवर कोणाचेही नियंत्रण नाही.