आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्ट तर्फे मिरा-भाईंदर येथे मोफत शरीर तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न



आश्रय ट्रस्ट व जय भोलेनाथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विदयमाने मिरा भाईंदर वासीयांसाठी मोफत शरीत तपासणी व मोफत शस्त्रक्रिया आयोजित करण्यांत आली होती. या शिबिरामधे मेंदूचे विकार, हदयविकार, मधुमेह, हाडांचे विकार, अस्थमा, नेत्र तपासणी व चष्मा वाटप असे अनेक प्रकारचे शिबिर आयोजित करण्यांत आले. या शिबिरामधे विनायक हॉस्पिटल वसई,कृष्णा डायलेसीस सेटर, सिपलो, असे अनेक हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत हे शिबिर संपन्न झाले.यामधे चष्माचे वाटप संस्कार सेवा संस्थाच्या संस्थापक पिंकी पाटील यांच्या वतीने करण्यात आले.आश्रय ट्रस्ट चे संस्थापक श्री.दिपक मोरेश्वर नाईक यांच्यावतीने अनेक मोतिबिंदू शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया मोफत करुन देण्यात येणार उर्वरित आहे. तसेच यावेळी कानाच्या मशीनही वाटण्यात  आल्या. यावेळी शिबिराचे उद्घाटन मिरा भाईंदर वाहतूक विभागाचे ठाणे ग्रामीण वरिष्ठ पोलिस | निरीक्षक श्री.अनिल पवार यांनी केले त्याचप्रमाणे मुंबई तरंगचे संपादक श्री.दिलीप पटेल यांनी आपला जन्मदिवस या शिबिरामधेच साजरा केला त्यांच्या सोबत शिव पांडे ही हजर होते .संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जय भोलेनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक श्री.रवी सोडा यांनी केले होते.यावेळी त्यांचे सर्व ट्रस्टी यांनी अथक मेहनत घेऊन शिबिरांची योजना अत्यंत व्यवस्थीत पार पाडली. पोलिस पत्रकार विनोद मेढे, अनिल मेहता, संदीप लोहार, प्रविण सुर्वे यावेळी उपस्थित होते. आश्रय ट्रस्ट च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी अश्या मोठया प्रमाणात मोफत शरीर तपासणी व शस्त्रक्रिया घेण्यात येतात.