ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक द्या - नंदू जाधव


दिनांक १५.१.२०२० रोजी भाईंदर उत्तन येथे वानप्रस्थाश्रमामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सोशल राईट्स फाऊंडेशनचे क्रिडा समिती अध्यक्ष नंदू जाधव यांनी वरील उद गार काढले. क्रिकेटमध्ये प्राविण्य मिळवलेल्या आपला मुलाचा सिध्देश चा वाढदिवस हॉटेल मध्ये साजरा न करता जेष्ठ नागरिकअसलेल्या आश्रमात साजरा केला. यावेळी दिडशे जेष्ठ नागरीकांना जेवण नंदू जाधव यांच्यावतीने देण्यांत आले.या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांनी नाच,गाणे असे कार्यक्रम स्वतःहा साजरे केले. वानप्रस्थाश्रम आश्रमातील प्रशासनाने या कामी खूप चांगले सहकार्य केले. प्रत्येकाने आपले जन्मदिवस अश्या आश्रमात साजरे करावे यामूळे जेष्ठ नागरिकांमधील दुरावा दुर होऊन एकनवीन नाते तयार होते व त्यांचाही विरंगुळा होतो असे नंदू जाधव यांनी सांगितले व हा कार्य क्रम मोठया आनंदाने साजरा केला.