सतत होणारे जेष्ठ नागरिकांचे तसेच लहान मुलांचे अपघात मोठया प्रमाणात साई वाडी च्या अंधेरी हाइवे व स्टेशनला जोडणाऱ्या पुलाजवळ सतत होत असतात. वारंवार महानगरपालिकेला कळवून देखील महानगरपालिका दुलर्भ करीत आहे व अधिकारीवर्ग उडवाउडवीची उत्तरे देतात. यासाठी तिथे सिनीअर सिटीझन सोशल राईट्स फाऊंडेशनच्या अंधेरी कमिटीच्या अध्यक्ष तुकाबाई चौधर यांच्यावतीने सर्व जेष्ठ नागरिकांना रस्त्यावर उतरवण्यात आले. रिक्षावाल्यांची मुजोरी, वेगाने वाहणारी वाहने , चौकात विजेचे खांब पुर्ववत नसणे , अशा अनेक प्रकारच्या मागण्या या जेष्ठ नागरिकांच्या होत्या. साईवाडी ते रेल्वे स्टेशन असा प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिकांना रिक्षावाले नकार देतात. यासाठी सदर संस्थेने वारंवार पोलिसांशी संपर्क करुन मागणी केली होती. जवळजवळ या परिसरात ३ ते ४ लाख लोकांची वस्ती आहे. येथे आपल्या जागा गमावून असुरक्षित अशी घरे या परिसरातील एस.आर.ए.च्या माध्यमातून बनवून दिली आहेत. व त्याच जागेवर आपली मोठमोठी व्यापारी संकुले इथल्या स्थानिक बिल्डरांनी बनवली आहेत. या वस्तीमधील सर्व रहिवाशांना एका कोपऱ्यात बिल्डींगी बांधून दिल्या आहेत. इतक्या मोठया वस्तीमध्ये जेष्ठ नागरीकांना एकविरंगुळा केंद्र ही बनवले नाही. यासाठी सिनिअर सिटीझन सोशल राईट्सच्या वतीने वारंवार मागणी केली असता कोणताही परिणाम झाला नाही. या आंदोलनासाठी संस्थापक दिपक मोरेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय उपसचिव संतोष चौधर , निवृत्त पोलीस अधिकारी पंढरीनाथ खंडागळे , संस्थेचे सल्लागार व पत्रकार अनंत दाभोळकर , किसन शेवाळे , दिलीप प्रभु,वासुदेव पाष्टे, उदय देशमुख, हरिश्चंद्र रेवाळे, कशिराम मांडवकर, महादेव पारदळे, राजाराम चव्हाण, शशिकांत बंड तसेच जेष्ठ नागरिकमोठया प्रमाणावर हजर होते.
अंधेरी साईवाडी येथे सिनीअर सिटीझन सोशल राईट्सच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले