हरित लवादाकडून एमआयडीसीतील पालघर- तारापूर एमआयडीसीतील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात अनेक तक्र री करूनही प्रदूषण मंडळाकडून ठोस कारवाई होत नसल्याने राष्ट्रीय हरित लवादानेच आता तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे प्रदूषण मंडळाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने तारापूरच्या प्रदूषणकारी उद्योगांना त्याची भरपाई म्हणून कोट्यवधी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी २००६ मध्ये उभारलेल्या सामुदायिक रासायनिक सांडपाणी प्रक्रि या केंद्राची क्षमता २५ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन इतकी होती. सांडपाण्यावर चार वेळा प्रक्रि या केल्यानंतरच ते प्रक्रि या केलेले पाणी बाहेर सोडले जाणे अपेक्षित असताना हा नियम पायदळी तुडवीत प्रदूषित रासायनिक पाणी बाहेर सोडले जात होते. त्यामुळे परिसरातील नवापूर, आलेवाडी, मुरबे, सातपाटी, उच्छेळी-दांडी आदी अनेक भागातील नदी, नाले, समुद्र, खाड्या, खाजण येथील वनसंपदा, भातशेती, मत्स्य संपदा संपुष्टात येण्याचे प्रकरणात वाढ झाली होती. तसेच काही कारखानदार प्रदूषित पाणी भूगर्भात सोडत असल्याने पाण्याचे साठे प्रदूषित होत परिसरातील अनेक गावांतील बोअरवेलला प्रदूषित पाणी येऊ लागले होते. यामुळे किनारपट्टीवरील नागरिक कॅन्सर, त्वचा रोग, दमा, टीबी अशा जीवघेण्या आजाराला बळी पडू लागले होते. या प्रदूषणावर ठोस उपाययोजना करून प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात कडक कारवाईच्या आंदोलनाकडे गांभीर्याने न पाहता उलट रासायनिक सांडपाणी प्रक्रि या केंद्राची क्षमता वाढवून सांडपाणी पाईपलाईनद्वारे थेट नवापर गावाच्या समोरील समुद्रात ८.१ कि.मी. आत सोडण्याचा प्रस्ताव मंजूर करीत कामही सुरू करण्यात आले होते.
या प्रदूषित पाण्यामुळे समुद्रातील प्रदूषण वाढून समुद्रातील मत्स्य संपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त करत या विरोधात हरित लवादात याचिका दाखल करण्यात आली.