रस्ता बंदमुळे मीरा-भाईदरकर वेठीस; वाहतूककोंडीत भर


भाईदर : शहराच्या मुख्य मार्गावर मेट्रोच्या कामामुळे मोठी वाहतूककोंडी होत असतानाच हाटकेश येथील महत्त्वाचा पर्यायी मार्गही महिनाभरापासून जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी बंद आहे. यामुळे पर्यायी मार्गावरही कोंडी होत असून कामामुळे रहिवासी संतापले आहेत. पाणीपुरवठा विभाग व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिक वेठीस धरले गेले आहेत. या कामासाठी अजून एक महिना जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रो-९ साठी छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य रस्त्यावर खोदकाम सुरू झाले आहे. आधीच या रस्त्यावर कोंडी होत असताना मेट्रोच्या कामामुळे कोंडीत अधिकच भर भाईदरकर वेठीस; वाहतूककोंडीत पडली आहे. त्यामुळे भाईंदरमधील नागरिकांनी काही प्रमाणात अंतर्गत रस्त्यांचा वापर सुरू केला आहे. यात न्यू गोल्डन नेस्टपासून थेट हाटकेश चौक व पुढे महामार्गावर वेस्टर्न हॉटेलजवळ निघणाऱ्या मार्गाचा वापर वाढला आहे. शिवाय, घोडबंदर-अदानी पॉवर स्टेशनकडून हाटकेशला येणाऱ्या रस्त्याचा वापरही आधीपासूनच केला जात आहे. परंतु, हाटकेशच्या या मुख्य मार्गावरील रस्त्याची एक बाजू जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे वाहतूककोंडीत भर गेल्या महिनाभरापासन बंद आहे. या भागात जलवाहिनी वरून असल्याने ती भूमिगत टाकण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. हा रस्ता एका बाजूने बंद केल्याने परिसरातील रहिवाशांना आपली वाहने काढणे तसेच ये-जा करणे जिकिरीचे बनले आहे. खोदकामामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून घरांमध्ये धुळीचा थर साचत आहे. यामुळे काही जणांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे.