पालघर जिल्हा पोलीस दलाकडून १ जानेवारी २०१९ ते २९ डिसेंबर २०१९ या कालावधीत अवैध धंद्यावर कारवाई करून करोडो रुपयेचा मुद्देमाल जप्त
रेती
अवैध रेती वाहतूक/ उत्खनन केलेबाबत ११२ गुन्हे रेती दाखल करण्यात आले असुन चोरलेली रेती व वाहने असा १४,६१,५५,७५८/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून २६३ आरोपीत यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.
गुटखा वाहतूक
गुटखा वाहतूक/विक्री करणे अंतर्गत १२१ गुन्हे दाखल करण्यात आले असुन आरोपीत यांचेकडून १२,८८,३२,४५३/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून १८२ आरोपीत यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.
दारू
अवैध दारू विक्री/वाहतूक केलेबाबत दारूबंदी कायद्यानुसार ६७३ गुन्हे दाखल करण्यात आले असुन अवैध दारू व वाहने असा२,४९,७१,०४९/रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ६८९ आरोपीत यांचे वर कारवाई करण्यात आली आहे.
जुगार/मटका
मुंबई जुगार कायद्या अंतर्गत केलेबाबत ७७ गुन्हे दाखल करण्यात आले असुन आरोपीत यांचेकडून ५८,२५,३८२/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून ४३६ आरोपीत यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ
एन. डी.पी.एस. कायद्यानुसार ८५ गुन्हे दाखल करण्यात आले OLICE असुन आरोपीची संख्या ११८ आहे त्यामध्ये १९,६८,२३,९९९/रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिटा कायद्यानुसार केलेली कारवाई
पिटा कायद्यानुसार 2 १८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३६ आरोपीत यांच्यावर कारवाई करण्यात आली असुन आरोपीत यांच्या ताब्यातून १,१७,७४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आर्म अॅक्टनुसार केलेली कारवाई
आर्म अॅक्ट नुसार १३ गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकुण ६२,६३३८५/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून २९ आरोपीत यांना अटक करण्यात आली आहे.