धुमधडाक्यात साजरा मिरा भाईंदरमध्ये शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आमगांवकर मागील १७ वर्षापासून मिरा भाईंदर मध्ये हा उत्सव साजरा करतात. हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानात अती भव्य स्वरुपात हा महोत्सव साजरा करण्यात येतो. मिरा भाईंदर हे इतर उर्वरित कोणत्याही समाजाचे नसून येथे ही जमीन संपूर्ण आग्री कोळी मालवणी या समाजाची आहे. परंतू झपाटयाने वाढत चाललेल्या परप्रांतीय बिल्डरांकडून सिमेंटच्या जंगलाचे आक्रमण झाले आहे यामुळे वरील समाज कमी होत चालला आहे. परंतु शिवसेनेच्या माध्यमातून आग्री कोळी मालवणी समाजाला एकत्रित करण्याचा हा महोत्सव मागील १७ वर्षे सतत केला जात आहे. या महोत्सवाचे पूर्ण श्रेय येथील स्थानिक आमदार प्रतापजी सरनाईक यांना दिले जाते. त्यांचा या महोत्सवामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे छोटे व्यवसायिक यांना एकत्र करुन घरगुती बनविलेल्या उत्पादनाला व्यवसायात पुढाकार मिळावा यासाठी नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांनी खूप मोलाचे कार्य केले आहे. या महोत्सवामुळे जुने जाणते स्थानिक एकमेकांना भेटतात. छोटे व्यवसायिक या १२ दिवसाच्या महोत्सवात आपला व्यवसाय थाटतात. येथे मोठया प्रमाणात जत्रेचे स्वरुप आलेले असते. सर्व पक्षीय आमदार, खासदार , नगरसेवक या कार्यक्रमात आपली हजेरी लावतात. आयोजक हरिश्चंद्र आमगावकराच्या वतीने त्यांचा सन्मान केला जातो. अनेकप्रकारचे कार्यक्रम येथे आयोजित करण्यात येतात. यामध्ये भजन किर्तन डबलबारी लावणी आग्री कोळी नृत्य येथेसादर करण्यात येतात.संस्कृती जोपासणारा महोत्सव येथे दरवर्षी मोठया प्रमाणात साजरा केला जातो. याही वर्षी खूप मोठया प्रमाणात हा महोत्सव पार पाडला.