देवनारमध्ये कचरा __ मुंबई- देवनार कचराभूमी येत्या ३१ डिसेंबपर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याची उच्च न्यायालयाने दिलेली मुदत पाळणे कठीण असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याठिकाणी कचऱ्यापासून ऊजानिर्मिती करण्याचा प्रकल्प कायान्वित होण्यास वेळ | लागणार असून तोपर्यंत मुंबईच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या कचराभूमीला आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी पालिकेने केली आहे. देवनार कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी उच्च न्यायालयाने पालिकेला ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत वाढवून देण्यासाठी पालिकेने अॅड्. अनिल साखरे यांच्यामार्फत याचिका केली आहे. बुधवारी या याचिकेवर सुनावणी झाली. तसेच ही मुदतवाढ का मागण्यात येत आहे यामागची परिस्थिती न्यायालयाला सांगण्यात आली. देवनार कचराभूमी शास्त्रोक्त बंद केल्यानंतर तेथे कचऱ्यापासून ऊजानिर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. दोन टप्प्यांत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जागतिक पातळीवरील ई-निविदा नुकत्याच काढण्यात आल्या आहेत. प्रकल्पाचा पहिला टप्पा नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्ण आणखी दोन वर्षे? होणार आहे, तर दुसरा टप्पा त्यानंतर एक वर्षांने कायान्वित होईल. परंतु अशा प्रकारच्या प्रकल्पांचे कंत्राट देण्याची अंतिम प्रक्रिया होईपर्यंत वेळ लागतो. शिवाय सध्या मुंबईत प्रतिदिवशी जमा होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी ६८०० म्हणजेच ७६ टक्के मेट्रिक टन कचऱ्याची कांजूरमार्ग येथील कचराभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. उवरित कचऱ्याची देवनार कचराभूमीवर उघड्यावर विल्हेवाट लावली जाते. मात्र ही कचराभूमीही सद्य:स्थितीला बंद करण्यात आली, तर मंबईकरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल. देवनार कचराभूमीवर अशा पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी निर्मिती पातळीवर कचऱ्याचे सका आणि ओला असे विलगीकरण झाल्यास हे प्रमाण शून्यावर येईल. मात्र लोकांमध्ये अद्याप ती जागरूकता आलेली नसल्याने निर्मिती पातळीवर कचऱ्याचे १०० टक्के विलगीकरण होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून देवनार कचराभूमीवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास दोन वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी पालिकेतर्फे करण्यात आली.
देवनारमध्ये कचरा आणखी दोन वर्षे?